कोपरगाव शहरात गांजा विक्री जोमात, पोलीस प्रशासन कोमात”* – अँड.नितीन पोळ
कोपरगाव शहरात बेकायदेशीर धंद्यामध्ये गांजा विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असून राजरोस गांजा विक्री होत असली तरी पोलिसांच्या कृपा आशीर्वादाने गांजा विक्रेत्यांवर कोणतीच कारवाई होत नाही यावरून गांजा विक्री जोमात तर पोलीस प्रशासन कोमात अशीच परिस्थिती दिसून येत आहे त्यामुळे गांजा विक्रेत्यावर त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की गोदावरी नदी पात्रात हनुमान नगर, गजानन नगर, स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूला कै सूर्यभान पाटील वाहडणे घाट,दत्त पार, गोदावरी नदीचा मोठपुल, नगर पालिके जवळील माधव बाग तसेच शहरातील अनेक नवीन उपनगरे या ठिकाणी दिवसा ढवळ्या गांजा शौकीन यांची वर्दळ सुरू आहे वयोवृद्ध यांच्या पासून अनेक तरुण मुले या व्यसनाच्या आहारी जात आहे कोपरगाव शहरात राजरोस पणे गांजा विक्री होत असल्या शिवाय व ग्राहकाना सहजासहजी गांजा उपलब्ध झाल्याशिवाय एव्हड्या मोठ्या प्रमाणात शहरात गांजा शौकीन वाढले नाही मात्र पोलिसांच्या
आशीर्वाद असल्याशिवाय हे शक्य नाही
आता पर्यंत शहरात बेकायदा दारू विक्री,मटका,जुगार अड्डे यांच्यावर नागरिकांनी तक्रार केल्यावर छोट्या मोठ्या कारवाया झाल्या आहेत मात्र आजून तरी कोपरगाव शहरात गांजा बाळगला म्हणून व विक्री करताना कोणावर कारवाई झाल्याचे दिसत नाही असे असले तरी या बेकायदेशी गांजा विक्रीस पोलिसांचा आशीर्वाद आहे असेच दिसते त्यातून पोलिसांना मोठे हप्ते मिळत आहे त्यामुळे पोलिसांचे या व्यवसायाला संरक्षण असल्याचे दिसून येते
गांजा पिऊन तर्र झाल्यावर या परिसरात अनेकदा छोटी मोठी भांडणे होत आहेत मात्र या कडे पोलीस प्रशासन जाणीव पूर्वक डोळेझाक करत आहे तर दुसरीकडे या गांजा बहाद्दर यांच्या कडून महिला भगिनींना देखील त्रास होत आहे कोपरगाव शहरात बेकायदेशी दारू वाहतूक करणारे अनेक जण या गांजा वाहतुकी मध्ये सहभागी आहे
असे असले तरी कोपरगाव एकंदर गांजा विक्री जोमात तर पोलीस प्रशासन कोमात अशीच परिस्थिती सद्या सुरू असून या परिसरात गांजा शौकिनांची धरपकड केल्यास कोपरगाव शहरात मोठे रॅकेट उघडकीस येऊ शकते व यात अनेक राजकीय पक्षाचे मोठे मासे गळाला लागू शकतात त्यामुळे या गांजा चार्जिंग केंद्रावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी या पत्रकाद्वारे केली आहे