आपला जिल्हा

टाकळी गटातील ३०९ लाभार्थ्यांना खावटी अनुदान वाटप

टाकळी गटातील ३०९ लाभार्थ्यांना खावटी अनुदान वाटप

 

कोपरगाव प्रतिनिधी– कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे सदस्य आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासन आदिवासी विभाग प्रकल्प राजूर अंतर्गत तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या कुटूंबास खावटी अनुदान व अन्नधान्य किराणा वाटप मोहीम सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील टाकळी गटातील टाकळी, ब्राह्मणगाव, नाटेगाव, येसगाव, रवंदे, खिर्डी गणेश, आंचलगाव व सोनारी या गावातील सुमारे ३०९ लाभार्थ्यांना किराणा साहित्याचे वाटप कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कारभारी आगवन यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

वाटप करतांना मान्यवर

या प्रसंगी प्रमूख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य श्रावण आसने, माजी उपसभापती अनिल कदम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र निकोले, जिनिग प्रेसिंग चे संचालक किसन आहेर, माजी संचालक दिलीप गायकवाड, मुख्याध्यापिका जोशी मॅडम, गणेश पळसकर, शशिकांत देवकर, राजेंद्र देवकर, दत्तात्रय मोरे, बाळासाहेब देवकर, लखन गायकवाड आदींच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.

जाहिरात

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे