संत जनार्दन स्वामी यांची ३२ वी पुण्यतिथी सोहळा संपन्न
कोपरगाव प्रतिनिधी - सोमनाथ डफाळ मो. 8788193839
संत जनार्दन स्वामी यांची ३२ वी पुण्यतिथी सोहळा संपन्न
कोपरगाव प्रतिनिधी – संत जनार्दन स्वामी ३२ वी पुण्यतिथी सोहळा कोपरगाव येथे ९ ते १५ डिसेंबर पर्यत भव्य जपानुष्ठान सोहळा व १६ डिसेंबर रोजी ३२ वी पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या आश्रमात आठ दिवस कीर्तन, भजन, हरिपाठ असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.गु
रुवार दिनांक १६ डिसेंबर रोजी ३२ वी पुण्यतिथी सोहळात श्री महंत स्वामी हरीगिरीजी महाराज (वाराणसी) हे महाराज उपस्थित होईन यांचे प्रवचन आणि राष्ट्रसंत संत जनार्दन स्वामी महाराज आश्रम ट्रस्ट बेट कोपरगावाचे नुतन अध्यक्ष होळकर (औरंगाबाद ) सरांचा व सदस्य यांचा सत्कार व या ट्रस्टच्या विश्वस्त पदी निवड झालेले सर्वाचे श्रध्दास्थान प. पु रमेशगिरी महाराज याचे पुजन करण्यात आले.
यावेळी वेगवेगळ्या भागातून मोठ्या दिंड्या येथे आल्या होत्या. पंचक्रोशीतील तसेच अन्य जिल्हातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमटी – भाकरीचा महाप्रसाद भाविकांनी घेतला.