आपला जिल्हा

संवत्सरच्या जिददी कोमल वाकचौरेंचा आदर्श सर्वांनी घ्यावा-स्नेहलताताई कोल्हे.

संवत्सरच्या जिददी कोमल वाकचौरेंचा आदर्श सर्वांनी घ्यावा-स्नेहलताताई कोल्हे.

कोपरगांव प्रतिनिधी :- सोमनाथ डफाळ

महिला वर्ग आपल्या कार्य कर्तृत्वातून सतत उभारी घेत असतो संवत्सरच्या जिददी आणि मेहनती कोमल वाकचौरेंचा सर्वांनी आदर्श घ्यावा असे आवाहन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी केले. तालुक्यातील संवत्सर सोसायटीचे सचिव भानूदास वाकचौरे यांची कन्या कुमारी कोमल भानुदास वाकचौरे हीची डॉ होमी भाभा नॅशनल इन्स्टीटयुट मध्ये न्युक्लिअर मेडीसीन संशोधक या पदावर राजपत्रीत अधिकारी म्हणून निवड झाल्याबददल त्यांचा कोपरगांव शहर व तालुका भाजपा तसेच संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने सोमवारी सत्कार करण्यांत आला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे होते.


सौ. स्नेहलताताई कोल्हे पुढे म्हणाल्या की, मनुष्याच्या अंगी जिदद असली की, जीवनांत कुठलीही गोष्ट अवघड नसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या सर्वोच्च पदावर आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मू यांना संधी दिली. एक शिक्षीका ते राष्ट्रपती हा त्यांच्या जीवनांतील सर्वोच्च क्षण असून शिक्षणाच्या जोरावर त्यांनी आयूष्यातील सर्वच कडु – गोड प्रसंगावर मात करत जीवनातील विशिष्ट टप्प्यावर आलेली संकटे परतवून लावत स्वतःला सिद्ध केले., तद्वत शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शिकवणुकीतुन संवत्सरची कोमल वाकचौरे शिकली आणि देशाच्या न्युक्लिअर मेडीसीन संशोधन पदावर तिला संधी मिळाली तीने त्याचे सोने करावे व ग्रामिण भागातील तिच्यासारख्या असंख्य मुला मुलींना मार्गदर्शन करून त्यांनाही त्या मार्गावर घेवुन जावे जेणेकरून ग्रामिण बुध्दीमत्तेत कोपरगांव तालुक्याचे नांव अग्रभागी राहिल. सत्कारास उत्तर देतांना कोमल वाकचौरे म्हणाली की, ग्रामिण अर्थकारणांत शिक्षणाचे योगदान वाढविण्यासाठी येथील नेतृत्वाने मोठे काम उभे केल्याने त्यातुन स्पर्धात्मक परिक्षेला सामोरे जाता आले.


प्रारंभी संचालक ज्ञानेश्वर परजणे यांनी प्रास्तविक केले. संचालक बापूसाहेब बारहाते, फकिरराव बोरनारे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ग्रामपंचायत सदस्य महेश परजणे यांनी कोमल वाकचौरेंच्या प्रतिकुल परिस्थितीत केलेल्या शिक्षणाविषयी माहिती दिली., याप्रसंगी माजी संचालक राजेंद्र भाकरे, संजय भाकरे, विजय काळे, रामभाउ कासार, संजीवनी पतसंस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र सखाहरी परजणे, योगेश परजणे, मुकूंद काळे, चिमा दैने, सोपान भाकरे, गणेश साबळे, आण्णासाहेब निरगुडे, तन्मय परजणे, दत्तात्रय परजणे, बाळासाहेब परजणे, भाउसाहेब परजणे, निलेश परजणे, अशोक लोहकणे, संदिप मैंद, प्रकाश सोमासे, मनोज शेटे, दिलीप कासार, अशिष बोरनारे, दिनेश बोरनारे, अनिल शेटे यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी ग्रामपंचायत सदस्य महेश परजणे यांनी आभार मानले.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे