आपला जिल्हा

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे मयत कामगाराच्या वारसास आ. आशुतोष काळेंच्या हस्ते ३.२० लाखाचा धनादेश सुपूर्त

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे मयत कामगाराच्या वारसास आ. आशुतोष काळेंच्या हस्ते ३.२० लाखाचा धनादेश सुपूर्त
कोळपेवाडी प्रतिनिधी:- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी यशवंत बापु हाळनोर यांचे अपघाती निधन झाल्यामुळे त्यांच्या वारस पत्नी श्रीमती अलका यशवंत हाळनोर यांना कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते ३ लाख २० हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला. 
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे ऊस विभागाचे हंगामी कायम कर्मचारी यशवंत बापु हाळनोर यांचा १३ एप्रिल २०२३ रोजी अहमदनगर येथे जात असतांना निंबळक बायपास अहमदनगर येथे अपघात होवून त्यांच्यावर साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शिर्डी येथे उपचार सुरु असतांनाच त्यांचे निधन झाले होते. कारखान्याचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रशासनाने कारखान्यातील सर्व कायम, हंगामी (कायम), हंगामी (टेंपररी) व दैनिक वेतनावरील हजेरी पत्रकावरील सर्व कामगारांचा दि ओरिएंटल इंशुरन्स कंपनी लि. शाखा कोपरगाव यांचेकडे अपघाती विमा घेतलेला आहे. जेणेकरून दुर्दैवाने कर्मचाऱ्याचे अपघाती निधन झाल्यास मयत कामगारांच्या वारसांना आर्थिक अडचण जाणवू नये या उद्देशातून अपघाती विमा घेतलेला आहे. 
जनता सामुहीक विमा पॉलिसीच्या माध्यमातून अपघातग्रस्त कर्मचाऱ्यांना रु.८०,०००/- दवाखाना खर्चासाठी दिले जातात व कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यु झाल्यास रु.३,२०,०००/- नुकसान भरपाई दिली जाते. मयत कर्मचारी यशवंत बापु हाळनोर यांचे अपघाती निधन झाल्यानंतर त्याबाबत कारखाना प्रशासनाने दि ओरिएंटल इंशुरन्स कंपनीकडे विमा पॉलिसीची भरपाई मिळावी यासाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती.ओरीएंटल इंशुरन्स कंपनीने सादर करण्यात आलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करून मयत कर्मचारी यशवंत बापु हाळनोर यांच्या वारसांना विमा पॉलिसिपोटी ३ लाख २० हजार रुपयांची नुकसान भरपाई विमा रक्कम मंजूर केली होती. सदरच्या ३ लाख २० हजार रक्कमेचा धनादेश नुकताच मयत कर्मचारी यशवंत बापु हाळनोर यांच्या वारस पत्नी श्रीम. अलका यशवंत हाळनोर यांना कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, सेक्रेटरी बाबासाहेब सय्यद, असि. सेक्रेटरी संतोष शिरसाठ, लेबर ऑफिसर सुरेश शिंदे आदी उपस्थित होते. 

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे