पद्मावती विकास सोसायटीच्या चेअरमनपदीकाळे गटाचे नानासाहेब बाचकर व्हा. चेअरमनपदी आप्पासाहेब बाचकर यांची निवड
पद्मावती विकास सोसायटीच्या चेअरमनपदीकाळे गटाचे नानासाहेब बाचकर व्हा. चेअरमनपदी आप्पासाहेब बाचकर यांची निवड
कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव तालुक्यातील चांदगव्हाण येथील पद्मावती विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी काळे गटाचे नानासाहेब म्हाळू बाचकर व व्हा. चेअरमनपदी आप्पासाहेब पांडुरंग बाचकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
पद्मावती विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत सर्वच्या सर्व १२ जागा काळे गटाच्या निवडून आल्या आहेत. निवडून आलेले सदस्य पुढीलप्रमाणे नानासाहेब म्हाळू बाचकर, आप्पासाहेब पांडुरंग बाचकर, विक्रम म्हाळु बाचकर, शिवाजी पांडुरंग बाचकर, रवींद्र विक्रम बाचकर, गोरक्षनाथ पांडुरंग बाचकर, बाळासाहेब पांडुरंग बाचकर, राहुल शिवाजी बाचकर, आण्णा बुवाजी शिंदे, रामदास गंगाधर बर्डे, श्रीमती मीनाताई विक्रम बाचकर, श्रीमती अलका शिवाजी बाचकरहे काळे गटाचे सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
सोसायटीच्या नूतन चेअरमन व व्हा. चेअरमनची पदाची निवडणूक नुकतीच निवडणूक अधिकारी डी. ए. सावंत यांच्या उपस्थितीत पार पडली आहे. या निवडणुकीत चेअरमनपदासाठी नानासाहेब म्हाळू बाचकर यांच्या नावाची सूचना रवींद्र बाचकर यांनी मांडली त्या सुचनेस आण्णा शिंदे यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमनपदासाठी आप्पासाहेब पांडुरंग बाचकर यांच्या नावाची सूचना शिवाजी पांडुरंग बाचकर यांनी मांडली त्यास गोरक्षनाथ बाचकर यांनी अनुमोदन दिले. चेअरमन व व्हा. चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे निवडणूक अधिकारी डी. ए. सावंत यांनी चेअरमनपदी नानासाहेब म्हाळू बाचकर व व्हा. चेअरमनपदी आप्पासाहेब पांडुरंग बाचकर यांची बिनविरोध निवड जाहीर केली.
यावेळी सर्व सदस्यांनी नवनिर्वाचित चेअरमन, व्हा. चेअरमन यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले. निवडणूक कामी सचिव संदीप चौधरी यांनी सहकार्य केले. नवनिर्वाचित चेअरमन, व्हा. चेअरमन यांचे माजी आमदार अशोकराव काळे व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत