समाजातील चांगले-वाईट जगासमोर व्यक्त करणारा घटक म्हणजे पत्रकार- साबळे
संघर्ष न्यूज संपादक - सोमनाथ डफाळ मो. 8788193839
समाजातील चांगले-वाईट जगासमोर व्यक्त करणारा घटक म्हणजे पत्रकार- साबळे
कोपरगाव प्रतिनिधी- ओम साई ग्रामीण शिक्षण संस्था कोपरगाव च्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त आयोजित पत्रकार दिनाच्या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे हे बोलत होते.
याप्रसंगी तालुक्यातील पत्रकार गणेश दाणे, मनीष जाधव, शंकर दुपारगुडे, जनार्दन जगताप, लक्ष्मण वावरे, सोमनाथ डफळ, अमोल गायकवाड, दीपक जाधव, संजय भारती, रवींद्र जगताप,अमीन शेख,हाफिज शेख, बिपिन गायकवाड, राहुल कोळगे, संतोष जाधव,सोमनाथ सोनपसारे, मधुकर वक्ते, सिद्धार्थ मेहेरखांब, पंडित भारुड, विनोद जवरे, सागर लकारे, विघे आदी पत्रकारांचा संस्थेच्या वतीने माजी पोलीस अधीक्षक के. पी. रोकडे, संस्थेचे अध्यक्ष परशराम साबळे, रजिस्टर बापू डांगे,एक्स आर्मी असोसिएशनचे उपाध्यक्ष मारुती कोपरे,माजी सैनिक रामनाथ वर्पे, पंकज झावरे,किशोर जगताप आदींच्या शुभहस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी साबळे यांनी बोलताना सांगितले की, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजात चांगले वाईट होणाऱ्या गोष्टी जगासमोर मानणारा तो एक प्रमुख घटक म्हणून कार्य करत असतो त्यासोबतच प्रशासन व राज्यकर्त्यावर वचक ठेवणारा महत्त्वाचा दुवा देखील पत्रकार हाच असतो.
याप्रसंगी संस्थेच्या वतीने भारत सरकारची स्किल इंडिया मान्यताप्राप्त असलेले एक वर्ष कालावधीच्या पत्रकारिता अभ्यासक्रमामध्ये यशस्वी झालेल्या पत्रकाराना सर्टिफिकेट वाटप करण्यात आले. यावेळी कमलाताई बाळासाहेब सातभाई बाळासाहेब तांत्रिक ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य विशाल धारणगावकर, महेंद्र झपाटे, निलेश देवकर, वंती गावित आदी संस्थेचे कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी माजी पोलीस अधीक्षक रोकडे,ज्येष्ठ पत्रकार गणेश दाणे, जनार्दन जगताप आदींनी आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय कापसे यांनी तर आभार रजिस्टार डांगे यांनी मानले.