महाराष्ट्र
नाशिक सातपुर येथील सुप्रिम वर्कर्स युनियन बेमुदत संपावर…
नाशिक सातपुर येथील सुप्रिम वर्कर्स युनियन बेमुदत संपावर…
नाशिक प्रतिनिधी : नाशिक सातपुर येथील विविध मागण्यासाठी येथील सुप्रिम वर्कर्स युनियन बेमुदत संपावर पुकारला आहे.एम. आय.टी. यू व पी. यु. एल. पी कायदा कलम २४ (१) मधील तरतुदीनुसार, सुप्रिम वर्कर्स युनियन, (सीटू संलग्न ) या नोटीस नुसार मे. सुप्रीम आटो सेल इंडिया प्रा. ली कंपनीला कळविण्यात आले की, दिनांक ३०/०९/२०२१ रोजी पासुन कंपनीतील कामगार हे बेमुदत संपावर जाणार आहेत असे पत्रात सांगितले.
कामगारांच्या वेतन वाढीवचे कराची रक्कम अदा न केलेलबाबत ,महागाई भत्ता देत नाही, संपूर्ण कुंटूंबाची मेडिकल पॉलिसी बंद केली ,सहा सहा महिने वेतन अदा न केलेबाबत अशा विविध मागण्यासाठी कामगारांनी बेमुदत संप पुकारला आहे. आता या संपामुळे कामगार मागण्यापुर्ण होता की नाही या कामगारांचे लक्ष वेधले आहे.