आपला जिल्हा

श्रमिक मजदूर संघ (एमडीएम) विभागाच्या कोपरगाव निमंत्रक पदी प्रकाश पानपाटील, संदिप देशमुख यांची निवड

श्रमिक मजदूर संघ (एमडीएम) विभागाच्या कोपरगाव निमंत्रक पदी प्रकाश पानपाटील, संदिप देशमुख यांची निवड

कोपरगाव प्रतिनिधी- भारतात सर्वात कमी मानधनावर काम करणाऱ्या एमडीएम स्वयंपाकी व मदतनीस यांची संघटना श्रमिक मजदूर संघाच्या कोपरगाव तालुका निमंत्रक पदी प्रकाश पानपाटील, ज्योती जावळे, दिपाली भागवत तर कोपरगाव शहर निमंत्रक पदी संदीप देशमुख व विद्या अभंग यांची नेमणूक संघटनेच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्ष सविता विधाते यांनी केली आहे. कोपरगाव येथील साईबाबा तपोभूमी मंदिर येथे तालुक्यातील शालेय पोषण आहार योजनेत काम करणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीस यांची बैठक अहमदनगर जिल्हाध्यक्ष सविता विधाते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीत विविध समस्या सोडवण्यासह अडचणीवर उपाय कसा शोधता येईल व भविष्यात संघटनेच्या वतीने शासन दरबारी आपले प्रश्न मांडून कसे सोडवण्यात येईल यावर चर्चा करण्यात आली. संघटनेच्या वतीने जिल्हाभर फिरून, संघटन करून न्याय मिळवला जाईल असे सविता विधाते यांनी सांगितले.संघटनेच्या कामावर सर्वांनी विश्वास ठेवून आपले प्रश्न सोडवू असे प्रकाश पानपाटील यांनी सांगितले. यावेळी तालुक्यातील सर्व भागातून स्वयंपाकी व मदतनीस मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदिप देशमुख यांनी केले तर आभार विद्या अभंग यांनी मानले.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे