आपला जिल्हा

जामीन फेटाळताच छातीत ‘कळ’, लाच प्रकरणातील आरोपी शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर रुग्णालयात

जामीन फेटाळताच छातीत ‘कळ’, लाच प्रकरणातील आरोपी शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर रुग्णालयात

नाशिक प्रतिनिधी : प्रसाद राजोळे

या आधी वैशाली वीर-झनकर यांच्या चार दिवसांच्या पोलीस कोठडीपैकी दोन दिवस त्यांचा मुक्काम रुग्णालयात होता. आता अंतरिम जामीन अर्ज फेटाळून कारागृहात रवानगी करण्याचे आदेश मिळताच वैशाली वीर यांच्या छातीत ‘कळ’ आली
आठ लाखांच्या लाच प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर (Vaishali Veer-Zankar) जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. छातीत दुखत असल्याच कारण सांगून त्या रुग्णालयात अॅडमिट झाल्या आहेत. शिक्षण संस्थेच्या सरकारी अनुदानला मंजुरी देण्यासाठी 8 लाख रुपयांची लाच घेताना नाशिकच्या शिक्षणाधिकारी वैशाली वीर झनकर पकडल्या गेल्या आहेत.

*छातीदुखीच्या त्रासामुळे रुग्णालय*
याआधी वैशाली वीर-झनकर यांच्या चार दिवसांच्या पोलीस कोठडीपैकी दोन दिवस त्यांचा मुक्काम रुग्णालयात होता. आता अंतरिम जामीन अर्ज फेटाळून कारागृहात रवानगी करण्याचे आदेश मिळताच वैशाली वीर यांच्या छातीत ‘कळ’ आली. त्यामुळे त्या आज पुन्हा रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. या प्रकरणातील दोन संशयित आरोपी चालक ज्ञानेश्वर येवले आणि प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
*अनुदानाला मंजुरीसाठी संस्थेकडे 9 लाखांची मागणी, 8 लाखावर तडजोड*
शिक्षक संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या 20 टक्के अनुदानातून नियमित वेतन करण्याचे आदेश देण्याच्या मोबदल्यात शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांनी 8 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. शासकीय वाहन चालकाच्या माध्यामातून ही लाच स्वीकारताना नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले होते. शिक्षण विभागातील मोठ्या पदावरील अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्यानंतर जिल्हा परिषदेत चर्चेला उधाण आलं. झनकर यांच्यासह यात वाहन चालक आणि एका प्राथमिक शिक्षकाचा सहभाग आहे.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे