तहसीलदार विजय बोरुडे राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित
तहसीलदार विजय बोरुडे राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित
कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील 79 गावाच्या विविध समस्यासह नैसर्गिक आपत्तीच्या काळात योग्य नियोजन करुन तालुक्यातील जनतेला प्रशासकीय लाभाबरोबर विविध दाखले वेळेत देण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सतर्क ठेवणे, या वर्षात गौणखनिज,अवैद्य वाळू उपसा प्रतिबंधात्मक अंतर्गत दंडात्मक कारवाई करुन महसूल गोळा करून शासनाच्या तिजोरीत जमा करीत सर्वच बाबतीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांना शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्था नाशिक यांच्या वतीने राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दरम्यान बोरुडे यांनी आपल्या कार्यकाळात स्थानिक प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी यांचे सांघीक कर्तव्य एकवटले, तालुक्यात आलेली पुरस्थिती, अतिवृष्टी, करोनाचे चालु असलेले महासंकट यात योग्य भुमिका बजावत तालुका सुरक्षीत ठेवण्याच्या कामात यशस्वी भूमीका बजावली