महाराष्ट्र

गुरुराज एच.पी गॅस एजन्सी आपल्या ग्राहकांच्या सेवेसाठी देत आहेत आपल्या गावातच गॅसच्या विविध सुविधा

गुरुराज एच.पी गॅस एजन्सी आपल्या ग्राहकांच्या सेवेसाठी देत आहेत आपल्या गावातच गॅसच्या विविध सुविधा

कोपरगाव प्रतिनिधी- कोपरगाव येथील प्रसिद्ध गुरुराज एच.पी गॅस एजन्सी आपल्या ग्राहकांचा कोपरगाव येथे येण्या जाण्याचा त्रास कमी व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तालुक्यातील विविध गावांमध्ये आपले अधिकृत एच.पी ग्राहक सेवा केंद्र सुरू केलेले आहे.त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे गुरुराज एच.पी गॅस एजन्सी ने आपले अधिकृत गुरु दर्शन कॉम्प्युटर एच.पी गॅस ग्राहक सेवा केंद्र हे सुरू केले असून या केंद्राचे उदघाटन कोपरगाव पंचायत समितीचे आपले सरकार सेवा केंद्राचे समन्वय मा.श्री.नितीनजी मोरे साहेब यांच्या शुभहस्ते व गुरुराज एच.पी गॅस एजन्सीचे संचालक विशाल जगताप यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाला तलाठी जावळे साहेब ,पंचायत समिती सदस्य श्रावण आसने पाटील,अमोल भुजबळ ,बाळासाहेब आहेर,अनुराग येवले,बाबा गुरु ,त्रिबंक आहेर .पांडुरंग डफाळ,ठकुनाथ आहेर. नानासाहेब हुलेकर.सचिन तांबे, प्रवीण जगताप तसेच ब्राम्हणगावातील ग्रामस्थ व गुरुराज एच.पी गॅस एजन्सीचे असंख्य ग्राहक उपस्थित होते.

यावेळी संचालक जगताप यांनी सांगितले की, ग्राहकांना गॅस संबंधी येणाऱ्या छोट्या-मोठ्या तांत्रिक अडचणी किंवा गॅस टाकी भरण्यासाठी तालुक्याच्या गावाला यावे लागत असे यातून त्यांचा वेळ आणि पैसा अधिकचा खर्च होत असे या त्रासातून काही अंशी ग्राहकांची मुक्तता व्हावी या गोष्टीचा विचार करत एच.पी गॅस एजन्सीने गावागावात आपले अधिकृत ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्याचा मानस मनाशी बाळगून आहे.
या अधिकृत सेंटरमध्ये गुरुराज एच.पी गॅस च्या ग्राहकांना तत्काळ गॅस टाकी आपल्या गावातच भरून मिळणार आहे त्यासोबतच ग्राहकांना गॅस संबंधी येणाऱ्या तांत्रिक अडचणी देखील तज्ञ व अनुभवी मेकॅनिक द्वारे दुरुस्त करून मिळणार आहे. तसेच प्रधानमंत्री उज्वला योजना अंतर्गत ग्राहकांची नवीन गॅस खरेदीसाठी ची नोंदणी देखील करून मिळणार आहे. त्यासोबतच तत्काळ नवीन घरगुती व व्यावसायिक गॅस कनेक्शन देखील मिळणार असल्याची माहिती संचालक जगताप यांनी देत या ग्राहक सेवा केंद्राचा परिसरातील ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

यावेळी ब्राम्हणगाव येथे सुरू करण्यात आलेल्या गॅस ग्राहक सेवा केंद्रामुळे ग्राहकांचा वेळ व पैसा वाचणार आहेतच त्यासोबतच ग्राहकांना तत्पर सेवा देखील उपलब्ध होणार आहे त्यामुळे गणेश आसने यांनी गुरुराज एच.पी गॅस एजन्सीचे संचालक जगताप व सर्व गुरुराज एच.पी गॅस एजन्सीचे आभार मानले.
गुरुराज एच.पी गॅस एजन्सी कायम आपल्या ग्राहकांच्या सेवेसाठी उत्कृष्ट पणे कार्य करत असून या कामासाठी संचालक जगताप यांच्या मार्गदशनाखाली ग्राहक सेवा केंद्राच्या नोंदणीचे काम भारती सोळंके, गणेश घाटे, वर्षा डहाळे व प्रसाद सुरे हे पाहत आहेत. तसेच गावागावातील गुरुराज गॅस एजन्सीच्या केंद्रांना गॅस टाक्यांचा व इतर गॅस संबंधित साहित्यांचा वेळेवर सुरळीत पुरवठा करण्याचे काम हरीश वीर, दिनेश मोरे व सुशील वाघमारे हे करणार आहे.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे