कंचन सुधा ज्युनियर कॉलेज येथे आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी !
कंचन सुधा ज्युनियर कॉलेज येथे आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी !
येवला प्रतिनिधी : शुक्रवार, दिनांक ०८/०७/२०२२ रोजी कंचन सुधा ज्युनिअर कॉलेज धानोरे येथे आषाढी एकादशी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.अक्षयजी जैन सर, प्राचार्य किरण नागरे सर, उपप्राचार्य सोमनाथ आहेर सर, स्कुलचे प्राचार्य पॉल सर, उपप्राचार्य निकम सर, कार्यक्रम प्रमुख सचिन सानप सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख राणी मोरे मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कॉलेज ते हनुमान मंदिर पर्यंत दिंडीचे आयोजन करण्यात आले. पखवाद व टाळाच्या गजरात सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी दिंडीचा आनंद घेतला. तसेच विद्यार्थ्यांनी विठ्ठलाचे विविध अभंग, गाणी साजरी केली. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून आषाढी एकादशीचे महत्व व पार्श्वभूमी सांगितली. प्रा. काद्री सर यांनी विठ्ठल भक्ती बद्दल माहिती दिली. प्रा. नागरे सर यांनी अध्यक्षीय भाषणातून आषाढी एकादशी बद्दल आपले विचार प्रकट केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुख्मिणी तसेच वारकऱ्यांच्या वेशभूषा परिधान करून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रीचल महाजन व रीतंभरा सानप यांनी केले. फलक लेखन सचिन सानप सर यांनी केले. छायाचीत्रणाचे काम भुरुक सर्, शोभा मॅडम, सैद सर् व सूर्यवंशी सर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा निकम सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख आणि सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रमाची शोभा वाढवली.