आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

सेवा निकेतन कॉन्व्हेन्ट स्कूल मध्ये विविध कार्यक्रम संपन्न

सेवा निकेतन कॉन्व्हेन्ट स्कूल मध्ये विविध कार्यक्रम संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी :- सेवा निकेतन कॉन्व्हेन्ट स्कूल मध्ये सिल्व्हर जुबली आणि सेवा पूर्ती कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शाळेमध्ये कार्यरत असलेले क्रिडा शिक्षक रमेश योव्हान येवले आणि स्काऊट मास्टर ज्ञानदेव हरिभाऊ घोरपडे यांनी शाळेत 25 वर्षे सेवा समर्पित केल्या बद्दल सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच रत्नमाला जाधव आणि शांताबाई घेगडमल यांच्या सेवापुर्ती निमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण विद्यार्थानी केले . शाळेच्या मॅनेजर सिस्टर मेरी कर्वालो व शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जॉयलेट परेरा यांच्या हस्ते व रमेश येवले, ज्ञानदेव घोरपडे,सौ.रत्नमाला जाधव आणि शांताबाई घेगडमल या कर्मचाऱ्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी शाळेच्या मॅनेजर सिस्टर मेरी कर्वालो यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळेसाठी केलेल्या अभिमानास्पद व गौरवशाली कार्याबद्दल संस्थेच्या वतीने कुतज्ञता व्यक्त करून कौतुक केले.सदर कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सत्कार मुर्तीच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशांत म्हस्के सर यांनी केले तर वसिमा शेख यांनी आभार प्रदर्शन केले

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे