आपला जिल्हामहाराष्ट्र
ब्राम्हणगाव येथे साई चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन
ब्राम्हणगाव येथे साई चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन
कोपरगाव प्रतिनिधी :कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे साई चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सलग आठ दिवस चालणाऱ्या या सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. दरवर्षी साई संदेश प्रतिष्ठाणने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा या सोहळ्याचे ९ वे वर्ष आहे.
ब्राम्हणगाव येथे साईचरित्र पारायण सोहळा महत्वाचा उत्सव असतो. आठ दिवस चालणाऱ्या या पारायण सोहळ्यास मोठ्या भक्तीभावाने सुरवात झाली.
साई चरित्र पारायण सोहळ्यात ६० अधिक भाविकांनी सहभाग घेतला आहे.
आठ दिवस चालणाऱ्या या सोहळ्यादरम्यान महिलांच्या हळदीकुंकु कार्यक्रमासोबत अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पारायण समाप्तीच्या दिवशी होणारी शोभा मिरवणूक हे या सोहळ्याचे खास वैशिष्ट्ये आहे.