आपला जिल्हा

ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्थे मार्फत ना.आशुतोष काळे यांचा वाढदिवस पर्यावरणपूरक साजरा – सोमनाथ डफाळ

ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्थे मार्फत ना.आशुतोष काळे यांचा वाढदिवस पर्यावरणपूरक साजरा – सोमनाथ डफाळ

कोपरगाव प्रतिनिधी : निसर्गावर विशेष प्रेम असल्याने तसेच मानवासाठी झाडांचे मोठे योगदान असल्यामुळे या प्रेरणेतून ना.आशुतोष काळे यांचा वाढदिवस पर्यावरणपूरक वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवित आला .
पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून ते जगविले पाहिजे, असे आवाहन ज्ञानतंत्र बहूद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ डफाळ यांनी केले.


जागतिक तापमानात होत असलेली वाढ, वातावरणातील बदल, बदललेले निसर्ग आणि ऋतुचक्र यांवर उपाय करण्यासाठी राज्य सरकारने वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला आहे. यानुसार ४ ऑगस्ट ब्राम्हणगाव येथे १० नारळाचे रोपे लावण्यात आले आहे. पूर्वजांनी सामाजिक वनीकरणाचा दृष्टिकोन ठेवला होता. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला गेला होता. वृक्ष निसर्गचक्र दाखवितात, त्यामुळे वृक्षांची जपणूक झाली पाहिजे. मात्र सध्या पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती महत्त्वाची असून प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून ते जगवले पाहिजे, असे आवाहन ज्ञानतंत्र बहूद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ डफाळ यांनी केले.

यावेळी श्रावण असणे माजी पंचायत समिती सदस्य , विठ्ठलराव असणे, बाबासाहेब जगताप ,तुकाराम हुळेकर, रमेश बर्डे, रवी पिंपरकर, सुरेश वाकचौरे, लहानु पवार ,वाल्मीक जगधने, शरद हुळेकर, ज्ञानदेव जिरे, गणेश बर्डे, तुकाराम असणे, सोन्याबापू कुर्हडे, विठ्ठल शिंदे, ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्थाचे अध्यक्ष सोमनाथ डफाळ ,विक्रांत आसने, गणेश बर्डे, गणेश आसने ,गणेश फापाले ,प्रसाद डफाळ, बाळू शिंगाडे इतर सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे