भावेश थोरात, संदीप कपिलेंनी भाविकांना घरबसल्या घडविले कुलदैवतांचे दर्शन
भावेश थोरात, संदीप कपिलेंनी भाविकांना घरबसल्या घडविले कुलदैवतांचे दर्शन
कोपरगाव प्रतिनिधी : सोमनाथ डफाळ
कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने सर्वच धार्मिक तीर्थस्थळे बंद केली होती. त्यामुळे भाविकांना प्रत्यक्ष दर्शन घेता आहे नाही. या पार्श्वभूमीवर साडेतीन शक्तीपीठे आणि जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेऊन कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने नुकतेच वाटप केले. याबद्दल भाविकांनी त्यांचे आभार मानले.
अवघ्या जगभर धुमाकूळ घालणार्या कोरोना विषाणूंमुळे सर्वच क्षेत्रांवर निर्बंध लादलेले होते. यामध्ये धार्मिक तीर्थस्थळांचाही समावेश होता. यामुळे भाविकांना प्रत्यक्ष देवांचे दर्शन घेता आले नाही. या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष भावेश थोरात व कार्याध्यक्ष संदीप कपिले यांनी महाराष्ट्राचे साडेतीन शक्तिपीठे श्री क्षेत्र रेणुका माता (माहूर), तुळजाभवानी (तुळजापूर), महालक्ष्मी अंबाबाई (कोल्हापूर) आणि सप्तश्रृंगी (वणी) येथे जाऊन दर्शन घेतले. तसेच जेजुरीच्या खंडोबाचेही दर्शन घेतले. याचबरोबर तेथील हळदी-कुंकू प्रसाद व भंडारा आणला. त्याचे शहरातील कर्मवीर नगर, दुल्हनबाई वस्ती, गोकुळनगरी, सह्याद्री कॉलनी, ओमनगर, साबळे वस्ती, द्वारका नगरी, आढाव वस्ती, शंकरनगर, गवारे नगर, बेनकर वस्ती, साबळे वस्ती, मांढरे वस्ती, वंडागळे वस्ती, पांढरे वस्ती आणि निवारा येथे घरोघरी जाऊन वाटप केले. या प्रकारामुळे महिलांमध्ये भक्तिमय व आनंदी वातावरण निर्माण झाले. त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष भावेश थोरात व कार्याध्यक्ष संदीप कपिले यांना भरभरून आशीर्वाद देत आभार मानले.