ब्रेकिंग
बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा ठार
बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा ठार
कोपरगाव प्रतिनिधी : नाटेगाव (ता.कोपरगाव) येथील भास्कर दादाहरी घोरपडे यांच्या वस्तीवर बांधलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला पळवून नेऊन ठार केले. रात्री ही घटना घडली. या घटनेने परिसरातील ग्रामस्थ हादरून गेले आहेत. वनविभागाने पुढील धोका ओळखून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
त्यांचा पाळीव कुत्रा बांधला होता. मध्यरात्रीच्या सुमारास या बिबट्याने या कुत्र्याला पळवून नेला .हा कुत्रा मृतावस्थेत आढळला. तो अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत होता . बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडल्याने परिसरात घबराट पसरली आहे. शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. वनविभागाने बिबट्याबाबत ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.