ब्रेकिंग

आमदार काळेंना मिळणाऱ्या मताधिक्याइतके मतदारसंघात करणार वृक्षारोपण- सोमनाथ डफाळ

आमदार काळेंना मिळणाऱ्या मताधिक्याइतके मतदारसंघात करणार वृक्षारोपण- सोमनाथ डफाळ

कोपरगाव – कोपरगाव विधानसभेकरीता महायुतीकडून उमेदवारी करत असलेले विद्यमान आमदार आशुतोष काळे जितक्या मताने निवडून येतील तितक्या प्रमाणात संपूर्ण मतदारसंघात वृक्षारोपण करणार असल्याचे ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ डफाळ यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे जाहीर केले आहे.


या पत्रकात डफाळ यांनी म्हटले आहे की, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या पाच वर्षात लोकप्रिय आमदार आशुतोष काळे यांनी तब्बल ३ कोटीचा निधी आणत मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला असून त्यामुळे त्यांचा विजय हा नक्कीच आहे. त्याचमुळे नेहमी सामाजिक कार्यात आग्रेसर असणाऱ्या संपूर्ण राज्यभरात ३ हजाराहून अधिकची सभासद संख्या असलेल्या कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्था कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने आमदार आशुतोष काळेंना कोपरगाव विधानसभा मतदार संघातून जितके मताधिक्य मिळेल तितक्या मोठ्या प्रमाणात संपूर्ण कोपरगाव मतदार संघात विविध देशी,औषधी,बहुपयोगी झाडांचे रोपण करत त्यांचे संगोपन करणार असल्याचे ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ डफाळ यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.


सोमनाथ डफळ व त्यांच्या ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्थेने घेतलेल्या या निर्णयाचे संपूर्ण महायुतीच्या कार्यकर्त्याकडून तसेच निसर्गप्रेमी नागरिकांकडून कौतुक केले जात आहे

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे