आपला जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्र

गेल्या महिन्यापासून लाखो रुपयाचे मशीन बेवारस अवस्थेत

संघर्ष न्यूज मुख्य संपादक - सोमनाथ डफाळ मो. 8788193839

गेल्या महिन्यापासून लाखो रुपयाचे मशीन बेवारस अवस्थेत

गोदावरी डाव्या कालव्यावरील ब्राम्हणगाव हद्दीतील चित्र

कोपरगाव प्रतिनिधी- साधारणपणे महिन्यापासुन उभे असलेले जेसीबी मशीन कोपरगाव तालुक्यातुन वाहणाऱ्या गोदावरी डाव्या कालव्यावर ब्राम्हणगाव हद्दीत धूळखात उभे असलेले दिसून येत आहे.

सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील ब्राम्हणगाव ते नाटेगाव या मुख्य रस्त्या लगत वाहणाऱ्या ब्राम्हणगाव गावापासून साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर गोदावरी डाव्या कालव्यावर लाखो रुपयांचे जेसीबी मशीन साधारणपणे एक महिन्यापासून धूळखात बेवारस पणे उभे असल्याचे दिसून येत आहे. तसेच गेल्या काही दिवसापासून गोदावरी डावा कालवा पाण्याने भरभरून वाहत असून तसेच या लाखो रुपयांच्या मशीन जवळ शासकीय कर्मचारी तर सोडाच पण साधा वॉचमन देखील सुरक्षेसाठी कधी दिसून आला नाही.

मशीन बंद असून निष्काळजीपणा मुळे बंद पडल्याचे दिसत आहे. कुठेही कोणत्याही प्रकारची सुरक्षेसबंधी काळजी न घेता उभे करून देत असेल तर नागरिक करारुपी भरत असलेल्या पैशाची उधळपट्टी यातून शासकीय कर्मचारी करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. म्हणजे या अधिकाऱ्याना शासनाचा काही धाक उरला नाही का? किंवा यात काही दुसरेच गौडबंगाल आहे? हा प्रश्न येथे उपस्थित होतो.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे