कोपरगाव तालुक्यातील रहिवाशी सेंट्रल जेल पोलीस सर्जेराव आहेर यांचे निधन
कोपरगाव तालुक्यातील रहिवाशी सेंट्रल जेल पोलीस सर्जेराव आहेर यांचे निधन
कोपरगाव प्रतिनिधी – कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील रहिवाशी सर्जेराव तुकाराम आहेर यांचे नुकतेच निधन झाले असून ते ५३ वर्षाचे होते.
कै सर्जेराव तुकाराम आहेर हे नाशिक येथील सेंट्रल जेल येथे सुमारे १५ वर्ष जेल पोलिस म्हणून कार्यरत होते.त्या नंतर सुमारे १० वर्षांपासून उस्मानाबाद येथे जेल पोलीस म्हणून कार्यरत होते. अतिशय प्रेमळ आणि हसतमुख व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले कै सर्जेराव आहेर हे संपूर्ण कोपरगाव तालुक्यासह नाशिक शहरात प्रसिद्ध होते. कै. साहेबराव काशिनाथ आहेर यांचे ते पुतणे तर सोपान तुकाराम आहेर, अर्जुन तुकाराम आहेर, दिपक तुकाराम आहेर व कैलास साहेबराव आहेर यांचे ते भाऊ होते. त्यांचा पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार असून त्यांचा अंत्यविधी बुधवार दि २० एप्रिल रोजी दुपारी २ वाजता मंजूर ता कोपरगाव येथील गोदातीरी होणार आहे.