आपला जिल्हा

कोपरगावात रोजगार मेळाव्याचे आयोजन – नगराध्यक्ष वहाडणे

कोपरगावात रोजगार मेळाव्याचे आयोजन – नगराध्यक्ष वहाडणे

कोपरगाव- मंगळवार दि १४ सप्टेंबर २०२१ रोजी व्हेंचर्स एज्युकेअर लिमिटेड आणि स्टाफ ब्लूम यांच्या कौशल्य विकास प्रकल्प अंतर्गत कोपरगाव येथे सुशिक्षित बेरोजगार मुला-मुलींसाठी भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्ष विजय वाहडणे यांनी दिली आहे.

सविस्तर वृत्त असे की नगराध्यक्ष विजय वाहडणे व एम.के आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालय कोपरगाव यांच्या संकल्पनेतून इयत्ता ८ वी व इयत्ता १० वी या वर्गात मल्टीस्किल व ऑटोमोबाईल हे विषय घेऊन पुढे आय.टी.आय, डिप्लोमा, पदवीधर तसेच इतर पात्र मुला-मुलींसाठी भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन ठीक दुपारी तीन वाजता एम.के. आढाव विद्यालयात प्रथमच विनाशुल्क आयोजन केले आहे.

तरी परिसरातील गरजू विद्यार्थ्यांसह विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी या नोकरी मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन नगराध्यक्ष विजय वाहडणे यांनी केले आहे.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे