महाराष्ट्र

नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्याला यश

नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्याला यश

नांदगाव प्रतिनिधी: नांदगाव मतदारसंघाच्या न्यायहक्कासाठी लढणारे आमदार सुहास आण्णा कांदे गेल्या काही दिवसापासून आपत्कालीन निधी उपलब्ध व्हावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करत होते ,दि .११/०९/२०२१ रोजी नांदगाव येथे झालेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री भुजबळ साहेब,प्रांत साहेब, जिल्हाधिकारी साहेब आणि नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक झाली,या बैठकीस सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होते

आमदार साहेबांनी पुन्हा एकदा झालेल्या नुकसानीचा पाढा वाचून दाखवला,अनेकांची दुकाने पाण्यात वाहून गेली,अनेक संसार उध्वस्त झाले,शेतकर्यांचे पिक भुई सपाट झाले असे असताना आपत्कालीन निधी देऊन जनतेला दिर द्या असा आग्रह आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केला असता प्रांत यांच्या अधिकारातून आणि DPTC जिल्हा नियोजन अंतर्गत आपत्कालीन निधी उपलब्ध करून देण्याचे सर्वांनी मान्य करून लवकरच सर्व पंचनामे केले जातील असा शब्द दिला,
प्रथम दर्शनी मतदार संघाची शहराची काळजी करणारे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे