आपला जिल्हा
सांगवी भुसार ग्रामपंचायतीच्या वतीने घनकचरा साठी ट्रॅक्टर-ट्रॉली लोकार्पण

सांगवी भुसार ग्रामपंचायतीच्या वतीने घनकचरा साठी ट्रॅक्टर-ट्रॉली लोकार्पण
कोपरगाव प्रतिनिधी– कोपरगाव तालुक्यातील सांगवीभुसार ग्रामपंचायतीच्या वतीने १५ वा वित्त अयोग योजने अंतर्गत खरेदी केलेला घनकचरा व्यवस्थापनासाठी ट्रक्टर व ट्रॉली चे गावांसाठी लोकअर्पण करण्यात आले.

यावेळी कोपरगाव पंचायत समिती चे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,विस्तार अधिकारी वाघमोडे,सांगवी भुसार गावचे आधारस्तंभ राजेंद्रबापू जाधव,विजय नाना जाधव,सरपंच रमेश आहेर,उपसरपंच मोहन कासार, भाऊसाहेब जाधव,बाबासाहेब जाधव,पुंडलिक मेहेरखांब, आण्णा शिंदे,ग्रामपंचायत सदस्य सुनिल बन्द्रे, विलास कासार , रोहिदास शिंदे, किशोर जाधव अशोकराव जाधव,भाऊसाहेब शिंदे, हरिभाऊ शिंदे,भिमराज गायकवाड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
