आपला जिल्हा

कोपरगाव प्रशासनाच्या वतीने श्री गणेश विसर्जन नियोजन जाहीर

कोपरगाव प्रशासनाच्या वतीने श्री गणेश विसर्जन नियोजन जाहीर

कोपरगाव प्रतिनिधी – कोपरगाव शहर प्रशासनातर्फे सर्वांना जाहीर आवाहन करण्यात येते की, रविवार दिनांक १९ सप्टेंबर २०२१ रोजी श्री गणेश विसर्जन करिता सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करत प्रशासनाने ठरवून दिलेल्या ठिकाणीच श्री गणेशाचे कोरोना नियमाचे पालन करत विसर्जन करावे असे आवाहन कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी, कोपरगाव शहर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या वतीने करण्यात आले आहे.

आपण आपले श्री गणपती मूर्ती विसर्जन प्रशासनाने ठरवून दिलेल्या नगरपरिषदेच्या मूर्ती संकलन केंद्रावर सुपूर्त करावी तसेच श्री ची आरती सर्वांनी घरूनच करून यायची आहे.
श्री गणेशाचे निर्माल्य हे आपल्याच घर परिसरातील झाडांना, कुंड्यांना टाकायचे आहे. जेणे करून पर्यावरणाचा समतोल राखण्यात येईल.
तसेच श्री गणेश मूर्ती विसर्जन सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत संकलन केंद्रावर सुपूर्त करायचे आहे. कोणीही गोदावरी नदी पात्रात विसर्जन करू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करत छोटा पूल घाट बाजू, गोदावरी पेट्रोल पंप समोर,पोलीस स्टेशनजवळ (चर्च),शनी मंदिर (टिळक नगर कॉर्नर),छत्रपती संभाजी महाराज सर्कल ,माधव उद्यान (बाग), साईबाबा तपोभूमी या प्रशासनाने ठरवून दिलेल्या संकलन केंद्रावर आपण आपल्या श्री गणेशाची मूर्ती सुपूर्द करावी.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे