खाकीतील माणूस आणि त्या माणसातील सृजनशीलता ठरली लाभदायी
खाकीतील माणूस आणि त्या माणसातील सृजनशीलता ठरली लाभदायी
चाळीसगाव प्रतिनिधी : चाळीसगाव शहरात खड्ड्यांचा रोजचा ताप , उपद्रव आणि अपघात हे शहरवासीयांसाठी असह्य झाल्याने , अखेर शहर वाहतूक शाखेचे सेनापती सदगीर साहेब व टीम ने पुढाकार घेतला. दिवसभर शहरातील रस्त्यावर थांबून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे आपले कर्तव्य निभावणाऱ्या या टीमने अखेर व्यापक जनहित व सामाजिक आरोग्य लक्षात घेता खड्डे बुजविण्याचा निर्णय घेतला. व विनाविलंब स्वखर्चाने खडी मिश्रित कच् चे डंपर मागविले आणि स्वतःच्या उपस्थितीतीत ते टाकून पसरविण्यात आले. हॉटेल ब्रिज कॉर्नर समोरील ब्रेकर जवळ असलेल्या खड्ड्यांमुळे सतत होणाऱ्या लहान-मोठ्या अपघातांना ब्रेक लागला.
हॉटेल ब्रिज कॉर्नर समोरील हनुमान मंदिरात रोजच पूजाअर्चा व आराधनेसाठी येणाऱ्या ज्येष्ठ / वयोवृद्ध भाविकांना आता खड्ड्यांचा सामना करावा लागणार नाही त्यामुळे त्यांच्यात आनंदाची भावना निर्माण झाली. रोजच या जीवघेण्या खड्ड्यांचा सामना करणारे वार्ड क्रमांक 1 मधील नागरिक व ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. रस्त्यांची दशा व दुर्दशा असह्य झाल्याने , स्वखर्चाने लोकहितवादी कार्य करून ” आधी केले मग सांगितलेचा दिला संदेश .