महाराष्ट्र
नांदगाव तालुक्यात झालेल्या नुकसान ग्रस्ताना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पाठ पुरावा करणार – आ. सुहास कांदे
नांदगाव तालुक्यात झालेल्या नुकसान ग्रस्ताना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पाठ पुरावा करणार – आ. सुहास कांदे
नांदगाव प्रतिनिधी : आज नुकसानाची वस्तुस्थिती नेमकी काय आहे ती पाहण्यासाठी आमदार सुहास कांदे यांनी आज जांभूळ पाडा, पिंप्री हवेली, पिंप्री हवेली तांडा नं.१, पिंप्री हिंगणे तांडा नं. २, हिंगणे डेहर गावांतील नुकसान ग्रस्तांशी संवाद साधला,
तसेच प्रशासन कडून लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्यासाठी प्रशासन व अधिकाऱ्याशी चर्चा करून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार सुहास कांदे यांनी गावातील नागरिकांना आश्वासन दिले यावेळी सोबत मा.सभापती विलास आहेर, गुलाबभाऊ भाबड, शिवसेना तालुका प्रमुख किरणभाऊ देवरे सरपंच अनिल वाघ व नागरिक उपस्थित होते. आमदार सुहास कांदे यांचे गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.