महाराष्ट्र

योग मार्गदर्शक,मनशक्तीचे श्री.संतोषजी नलगे साहेब यांना “समाजरत्न” पुरस्कार जाहीर…

योग मार्गदर्शक,मनशक्तीचे श्री.संतोषजी नलगे साहेब यांना “समाजरत्न” पुरस्कार जाहीर…

जाणता राजा प्रतिष्ठान,भानसहिवरा यांची घोषणा…

कोपरगाव प्रतिनिधी – सोमनाथ डफाळ

जाणता राजा प्रतिष्ठान,भानसहिवरा ता.नेवासा वतीने मातोश्री स्व.सौ.द्वारकाबाई मारुतराव मोहिटे पाटील स्मरणार्थ अहमदनगर जिल्हा परिषदेचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी,योग शिक्षक,मनशक्तीचे श्री.संतोषजी नलगे साहेब यांना “समाजरत्न” पुरस्कार जाहीर झाला असल्याची घोषणा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव मोहिटे पाटील यांनी केली आहे.

जाणता राजा प्रतिष्ठानने अहमदनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय व दिशादर्शक कामगिरी करणाऱ्या १५ व्यक्तींची प्रोत्साहन म्हणून निवड करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद अहमदनगर येथील प्रशासकीय सेवेत त्यांनी पारनेर, जिल्हा परिषद अहमदनगर येथे सेवा केली आहे.सध्या ते पंचायत समिती कोपरगाव येथे कार्यरत आहेत.प्रशासकीय सेवेत सतत कार्यरत राहून कर्तव्याला प्राधान्य देणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात.

मनमिळावू स्वभावाचे श्री.संतोषजी नलगे साहेब यांचे वडील कै.दत्तात्रेयजी नलगे यांनी भेंडा,तरवडी,भानसहिवरे या गावांसह इतरही गांवात ग्रामसेवक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.श्री.संतोषजी हे हाॅलीबाॅलचे पुणे विद्यापीठ खेळाडू राहिले आहे.योगासनात ते पंडित परिक्षा प्राविण्य असून मनशक्ती केंद्राचे साधक आहे.तसेच अहमदनगर जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी सोसायटीचे संचालक आहेत.अनेक प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी, सर्वसामान्य नागरिकांना योगासनाचे मोफत प्रशिक्षण आणि मार्गदर्शन सेवा निरंतर सुरू आहे.

प्रशासकीय सेवा आणि सामाजिक भान ठेवून आदर्श व्यक्तिमत्व श्री.संतोषजी नलगे साहेब यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे