गुरुराज एच.पी गॅस एजन्सीद्वारे महिलांना नवीन गॅस कनेक्शनसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू – संचालक विशाल जगताप
गुरुराज एच.पी गॅस एजन्सीद्वारे महिलांना नवीन गॅस कनेक्शनसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू – संचालक विशाल जगताप
कोपरगाव- कोपरगाव येथील गुरुराज एच.पी गॅस एजन्सी द्वारे तालुक्यातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की केंद्र सरकार द्वारे सुरू असलेल्या उज्वला गॅस योजने अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक महिलेला अतिशय अत्यल्प दरात नवीन गॅस कनेक्शन मिळणार असून या संधीचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन गुरुराज एच.पी गॅस एजन्सी कोपरगाव चे संचालक विशाल जगताप यांनी केले आहे.
यावेळी संचालक जगताप यांनी सांगितले की, तालुक्यातील विविध गावात गुरुराज एच.पी गॅस एजन्सी चे अधिकृत ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यात आले असून या ठिकाणी गावा- गावातील महिलांनी केंद्र सरकारद्वारे अतिशय अत्यल्प रकमेत मिळणारे नवीन गॅस कनेक्शन उपलब्ध करण्यात आले असून या संधीचा पात्र महिलांनी लाभ घ्यावा
यासाठी खालील कागदपत्रे पूर्ण करत गुरुराज एच.पी गॅस एजन्सीच्या आपल्या गावातील अधिकृत केंद्रात संपर्क साधावा
आवश्यक कागदपत्रे- महिलेचे आधार कार्डची झेरॉक्स (मोबाईल क्रमांक लिंक असलेले), महिलेचा पासपोर्ट फोटो, महिलेचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असलेले पासबुक झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स (१२ अंकी क्रमांक असलेले), रेशन कार्ड नसल्यास कामानिमित्त स्थलांतरित असलेल्या महिलेचे तसे स्व:प्रतिज्ञा पत्र तसेच रेशन कार्ड मधील सर्व सदस्यांची आधार कार्ड झेरॉक्स आदी कागदपत्रांची पूर्तता करून आपल्या गावातील गुरुराज एच.पी गॅस एजन्सीचे अधिकृत ग्राहक सेवा केंद्रास भेट देत या संधीचा लाभ घ्यावा.
अधिक माहितीसाठी संपर्क- मुख्य कार्यालय गुरुराज एच.पी गॅस एजन्सी,गाळा नंबर १२, सर्वे नंबर ३४/८, जिनिंग अँड प्रेसिंग व्यापारी संकुल, स्टेशन रोड कोपरगाव, तालुका कोपरगाव. मो नं-९६१३२८५२८५, ७५०७५०१३८२.