आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

गोदा व्हॅलीमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी

गोदा व्हॅलीमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी

कोपरगाव दि. १० जुलै : रवंदे येथील ओम साई एज्युकेशन सोसायटी संचलित – गोदा व्हॅली इंग्लिश मीडियम आणि इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त अनेक कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले.मोबाईलची या युगामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या परंपरेची, संस्कारांची आणि संस्कृतीची माहिती व्हावी आणि विद्यार्थ्यांमध्ये असे सण-उत्सव आनंदाने साजरी करण्याची सवय लागावी; यासाठी शालेय स्तरावर अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आणि शैक्षणिक वर्षाची सुरुवात ही आषाढी एकादशीच्या वारीने होते. त्यामध्ये मागील दोन वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आषाढी एकादशीचे नियोजन करता आले नाही; म्हणून यंदा सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांद्वारे आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.

यावेळी ओम साई एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर कदम, खजिनदार सौ दिपाली कदम, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अनिता कडलक,सर्व शिक्षक, शाळेतील विद्यार्थी आणि पालक वर्ग यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन कार्यक्रमाला शोभा आणली.

श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्ती पूजेचा मान शाळेचे पालक घायतडकर, दौंड, कदम, दवंगे,आहेर इ. दाम्पत्यांना देण्यात आला

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे विद्यार्थी सुशांत माळी आणि सार्थक दवंगे या विद्यार्थ्यांनी केले तर पाहुण्यांचे स्वागत गोरडे मॅडम यांनी केले.

श्री विठ्ठलाच्या प्रमुख भूमिकेत ऊर्वी कदम आणि रुक्मिणीच्या भूमिकेत प्रणाली चंद्रे या विद्यार्थिनी आकर्षणाचे केंद्र ठरल्या.

शाळेतील विद्यार्थ्यांद्वारे गाणी, अभंग, पोवाडे, नृत्य आणि नाटिका इत्यादी कलाकृती सादर करण्यात आल्या. यामध्ये प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे संत गोरा कुंभार यांच्या जीवनातील प्रसंग.श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या पालखीची दिंडी काढण्यात आली. यावेळी इयत्ता पहिली ते दहावीतील सर्व विद्यार्थ्यांनी रिंगण धरून माऊलींच्या जयघोषात सारा परिसर आनंदमय करून दिला.

या भक्तिमय उत्साहाच्या वातावरणात शाळेच्या शिक्षिका मोहरे मॅडम यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे