कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना आरोग्य विभागाकडून विनंती आहे की..
संघर्ष न्यूज मुख्य संपादक - सोमनाथ डफाळ मो. 8788193839
कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना आरोग्य विभागाकडून विनंती आहे की..
सदरील मेसेज सर्वानी पुर्ण वाचावा,
सर्वप्रथम ज्यांनी कोरोनाचे लसचे दोन डोस घेतले आहे त्यांचे अभिनंदन व धन्यवाद.
यावरच आपली जबाबदारी संपली असे नाही, कारण जर कोरोनाची लाट पुन्हा पसरली तर ती आपणास बाधीत करणार नाही असे नाही ,
त्यामुळे; जर कोणी आपल्या घरात , गल्लीत , गावात लस घ्यायचे बाकी असतील तर त्यांना लस घेण्यास प्रवृत्त करा कारण तेच कोरोनाचे सुपरस्प्रेडर ठरू शकतील.
अजून बालकांवरील लस यायची बाकी आहे त्यांना सुरक्षित ठेवायचे असेल तर १०० % लसीकरण होने गरजेचे आहे ,
लस न घेण्यामागे अगदी क्षुल्लक कारणे नागरिक सांगतात
एक म्हणजे चुकीची अफवा ,
दुसर म्हणजे इंजक्शनची अथवा लसबद्दलची भिती ,
आणि तिसरं म्हणजे दुर्धर आजार .
पहिल्या दोन्ही कारणा ची संख्या जास्त आहे आणि ती आपण सहज दूर करू शकतो
बाकी दुर्धर आजार असणाऱ्यांसाठी वैदयकीय सल्ल्यानंतर ते पण शक्य आहे .
एक डॉक्टर म्हणून मी आपणास आव्हान करतो की
लस ही पूर्णपणे सुरक्षित असून …
लस घेतलेले व्यक्ती कमी बाधित होतात…
म्हणून लगेच लस घेऊन स्वतः ला .. आपल्या कुटुंबाला.. सुरक्षित करा..
आणि कोरोना पासून बचाव करा…
आपणाकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त करतो
डॉ विकास घोलप
( एमबीबीएस )
तालुका आरोग्य अधिकारी
कोपरगाव..