श्री. क्षेत्र ब्राम्हणगाव येथे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांच्या मंदिराचा ९ वा वर्धापन दिनसंपन्न
श्री. क्षेत्र ब्राम्हणगाव येथे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांच्या मंदिराचा ९ वा वर्धापन दिनसंपन्न
कोपरगाव प्रतिनिधी : राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज समाधी स्थान बेट कोपरगावाचे मठाधिपती व समाधी स्थानाची मुख्यविश्वस्त प.पु. रमेशगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने ब्राम्हणगावातील राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या मंदिराचा ९ वा दिन सोहळा नुकताच संपन्न झाला. यानिमित्त जनार्दन स्वामी महाराजांच्या पंचधातुच्या मुर्तीला नर्मदेच्या पाण्याने अभ्यंगस्नान, अभिषेक व महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी ९ वाजता संत जनार्दन स्वामी महाराजाच्या पालखीची संपूर्ण गावातुन मिरवणूक काढण्यात आली.
ह.भ.प बाळकृष्ण महाराज (पेंडेफळ) यांचे जाहीर हरी किर्तन ठेवण्यात आले. महाराजांनी आपल्या किर्तनातून आपण समाजात जगत असताना आपण सर्व प्रथम आपल्या घरातील वडिलधार्यांची सेवा करा व आपण स्वतः हा चांगले वागा जेणे करून आपले घरा ,गाव, तालुका जिल्हा व देश सुधारेल असे त्यानी सांगितले.
ब्राम्हणगावातील राष्ट्रसंत जनार्दन स्वामीचे परमभक्त व प्रगतशील शेतकरी श्री. आनंदा पंढरीनाथ बनकर यांनी या वर्षांची पंगत दिली . गावातील व पंचक्रोशीतील भाविकांना आमटी भाकरी व बुंदी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
नर्मदा नदीला जाऊन पाणी आणण्यासाठी गेलेल्या ब्राम्हणगावातील भक्तांनी जनार्दन स्वामी आश्रमासाठी ५१०१/- रुपये दिले व पुढील ५ वर्ष वर्धापनदिनाला अन्नदानाचे नारळ घेतले. त्या बद्दल जनार्दन स्वामी भक्त मंडळाने सर्वांचे हार्दिक आभार मानले.