आपला जिल्हा

बाळासाहेब सातभाई व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर चा शंभर टक्के निकाल

कोपरगाव प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ मुंबई यांच्यामार्फत सप्टेंबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या बाळासाहेब सातभाई व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर कोपरगाव या मान्यताप्राप्त महाविद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी व कन्स्ट्रक्शन सुपरवायझर या दोन्ही अभ्यासक्रमाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात तब्बल ९ विद्यार्थी विशेष प्रावीण्य तर २६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत दोन्ही अभ्यासक्रमाचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

यामध्ये हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमात प्रथम क्रमांक प्रेम जगदीश पगारे (७६.६६) द्वितीय क्रमांक वैष्णवी संजय पवार(७२.६६), तृतीय क्रमांक सुजित जगन्नाथ बावके(७२.५) तर कन्स्ट्रक्शन सुपरवायझर या अभ्यासक्रमात प्रथम क्रमांक ज्ञानेश्वर रामदास शेजवळ(७७.१६), द्वितीय क्रमांक आनंद एकनाथ बारसे(७६.३३)तर तृतीय क्रमांक ऐश्वर्या उदयकुमार ओस्तवाल(७६) यांनी मिळवला आहे. तर माया भाऊसाहेब रोकडे, समर्थ बबलू लकारे, विशाल रविंद्र जाधव, नवनाथ ज्ञानदेव डांगे,चंद्रकांत अण्णा धोत्रे, गणेश बाळासाहेब त्रिभुवन, अविनाश राजाराम कुऱ्हाडे, अजित गोरक्षनाथ कार्ले, किरण देविदास जाधव, सुजित चांगदेव कदम, तुषार सखाराम चौधरी, रूपाली परशराम औट्टे, मयुर अनिल गायकवाड, सत्यम प्रसाद परहे, प्रतिक्षा उत्तम साताळकर, अक्षय बाळासाहेब साबळे, शुभम राजेंद्र जोशी, माधुरी जॉन दिवे, अमेर सलीम पठाण, स्वामीनाथ जयवंत मोरे,प्रशांत भीमराव संत, शेखर विठ्ठल गायकवाड, अमोल आण्णा धोत्रे, ज्ञानेश्वर भानुदास गायकवाड, आशिष जीवनलाल गरुड, कौशल युवराज मोहिते, सपना गणेश पवार, संकेत चंद्रशेखर कडवे, शीतल बाळासाहेब आहेर हे विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे मार्गदर्शक माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, माजी नगराध्यक्षा ऐश्वर्या सातभाई, संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे,सचिव सुचित्रा साबळे,रजीस्टार बापू डांगे, प्रा. विजय कापसे, प्रा. विशाल धारणगावकर,प्रा. विजय जाधव, प्रा.विलास चव्हाण, राजेंद्र आहेर,सोनाली कापसे, महेंद्र झपाटे, निलेश देवकर, वंती गावित आदी शिक्षक व शिक्षकेकेत्तर कर्मचाऱ्यांसह सर्व आजी-माजी विद्यार्थी व विद्यार्थिनीनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे