ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेत पत्रकार दिन उत्साहाने संपन्न
ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेत पत्रकार दिन उत्साहाने संपन्न
कोपरगाव प्रतिनीधी- मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक “दर्पणकार” आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त ओम साई ग्रामीण शिक्षण संस्था कोपरगाव येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधत कोपरगाव तालुक्यातील पत्रकाराचा गौरव सन्मान संस्थेच्या वतीने माजी पोलिस अधीक्षक के पी रोकडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास रजिस्टार बापूसाहेब डांगे यांच्या सह जेष्ठ पत्रकार जनार्धन जगताप, फकीर टेके, रोहित टेके, मनीष जाधव, लक्ष्मण वावरे, विनोद जवरे, संतोष जाधव, बिपिन गायकवाड, सोमनाथ डफाळ, संजय भारती, रवींद्र जगताप, किसन पवार, अमोल गायकवाड, राहुल कोळगे, दिपक जाधव, अमीन शेख आदी पत्रकार उपस्थित होते.
प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करत उपस्थित सर्व पत्रकारांना संस्थेच्या वतीने भेटवस्तू देत गौरविण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष साबळे यांनी बोलतांना सांगितले की, देशांच्या प्रगतीमध्ये पत्रकारांचे मोलाचे योगदान असून पत्रकारीतेत बदल घडविण्याची मोठी ताकद आहे तसेच पत्रकार हा जगातील चांगल्या वाईट गोष्टी अधोरेखित करणारा महत्वाचा घटक असल्याचे मत साबळे यांनी व्यक्त करत सर्व पत्रकारांना शुभेच्छा देत अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी पोलीस अधीक्षक के पी रोकडे यांनी देखील सर्व पत्रकारांना शुभेच्छा देत अभिनंदन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी निलेश देवकर, रेखा दिवे, सुशांत साबळे, सुमेध आहेर आदींनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय कापसे यांनी केले तर पत्रकार रोहित टेके यांनी ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेने सर्व पत्रकाराचा सन्मान केल्या बद्दल आभार व्यक्त करत सर्वाना शुभेच्छा दिल्या.