नाटेगाव शाळेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
नाटेगाव शाळेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
कोपरगाव प्रतिनिधी -: कोपरगाव तालुक्यातील उपक्रमशील जिल्हा परिषद शाळा नाटेगावचे विद्यार्थी सलग पाच वर्ष शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकत आहे. सन २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षेत १७ विदयार्थ्यांपैकी १५ विद्यार्थी चांगल्या गुणांनी पात्र आहे.
एकूण ८८.23% निकाल लागला व शाळेचे तीन विद्यार्थी संस्कार मिलींद गुंजाळ 236 गुण, प्रिया ज्ञानेश्वर मोरे 226 गुण जान्हवी ज्ञानदेव मंचरे 224 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत पात्र झाले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना कोपरगाव तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी मा. शेख मॅडम, येसगाव केंद्राच्या केंद्रप्रमुख मा. भोईर मॅडम यांचे विशेष अनमोल मार्गदर्शन लाभले.
या शाळेचे मुख्याध्यापक विजय पाटील सर, वर्गशिक्षिका सोनाली निळे मॅडम, श्री गुंजाळ सर- पालक, श्रीमंचरे सर, श्रीम राऊत मॅडम, श्रीम. थोरात मॅडम यांनी विशेष मार्गदर्शन केले. ग्रामस्थ, सरपंच, शा.व्य. समिती अध्यक्ष यांनी शाळेचे अभिनंदन केले आहे.