आपला जिल्हामहाराष्ट्र

गोदा व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल रवंदे येथे दहावीची परीक्षा सुरळीत सुरू

रवंदे येथे दहावीची परीक्षा सुरळीत सुरू

कोपरगाव प्रतिनिधी : कोरोनामुळे अनिश्तितेचे सावट असलेली दहावीची ऑफलाईन परीक्षा अखेर दि.१५ मार्च २०२२ पासून सुरू झाली आहे. एकंदरीत परीक्षा सुरळीत पार पडली. दरम्यान, गेल्यावर्षी कोरोनामुळे परीक्षा न घेताच मागील इयत्तेच्या मूल्यांकनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला होता. यंदा मात्र परीक्षा होत आहे.


दोन वर्षांपासून शाळा महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचा लेखन सराव कमी झालेला असल्याने पेपर सोडवण्यासाठी ३० मिनिटे अधिकचा वेळ देण्यात आला. असे काही चित्र गोदा व्हॅली इंटरनॅशनल स्कूल रवंदे येथे दिसून आले. या ठिकाणी १८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. आजचा शेवटचा भूगोल पेपर असल्यामुळे काही विद्यार्थ्यांनच्या चेहऱ्यावर धाक धूक आणि भीती दिसून आली होती. पेपर झाल्या नंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एकच आनंद दिसून आला . परीक्षेसाठी शाळेचे उपकेंद्र संचालक श्रीमती कडलक मॅडम (रनर) श्री निकम सर (सुपरवायझर) श्री रणदिवे सर व सह (सुपरवायझर) श्रीमती सोनवणे मॅडम व शाळेचे संस्थापक श्री चंद्रशेखर कदम सर आदि पेपर साठी उपस्थित होते व पेपर सुरळीत चालू असल्याचे दिसले
दरम्यान कोरोनाचे सर्व नियम पाळून मास्क व सोशल डिस्टंसिंग ठेवून सुरळीत पेपर पार पडला.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे