आपला जिल्हामहाराष्ट्र

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती समता चारीटेबल ट्रस्ट ब्राम्हणगाव यांच्या वतीने उत्साहात साजरी

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती समता चारीटेबल ट्रस्ट ब्राम्हणगाव यांच्या वतीने उत्साहात साजरी

कोपरगाव प्रतिनिधी – क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती समता चारीटेबल ट्रस्ट ब्राम्हणगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आली. याप्रसंगी गावातील प्रतिष्ठत व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रथम ब्राम्हणगावातील महात्मा फुले चौक (बाजार तळ) या ठिकाणी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे श्री पोपटराव आसने व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री निवृत्तीभाऊ बनकर यांनी पूजन केले.

त्यानंतर ब्राम्हणगाव ग्रा. पं उपसरपंच श्री रामदास पवार व जेष्ट नेते श्री बाळासाहेब आहेर यांनी ग्रामपंचायत मधिल क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.श्री बाळासाहेब बनकर यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या।प्रतिमेचे पूजन केले व श्री त्रिंबक आहेर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून श्री पुंडलिक शिंगाडे यांनी नारळ फोडून अभिवादन केले.

या जयंती निमित्त गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .या प्रसंगी समता चारीटेबल ट्रस्ट यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केले.या कार्यक्रमासाठी गावातील सर्व युवा या जयंती दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश आहेर यांनी केले.तर आभार प्रदर्शन अशोक बनकर यांनी केले. सर्वांनी शासनाच्या नियमचे पालन करत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केले आहे.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे