ब्राम्हणगाव ग्रामपंचायतीचे ग्रामस्थांकडे दुर्लक्ष ?
ब्राम्हणगाव ग्रामपंचायतीचे ग्रामस्थांकडे दुर्लक्ष ?
कोपरगाव प्रतिनिधी – अहमदनगर जिल्हात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू आहे त्यात कोपरगाव तालुक्यात लोकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत आहे.या लसीकरणापासून कोणी वंचित राहू नये म्हणुन कोपरगाव आरोग्य विभागाअंतर्गत जनजग्रुती करण्यात येत आहे. या लसीकरणासाठी आरोग्य केंद्राचे कर्मचारी,अधिकारी अतिशय प्रामाणिकपणे हे काम करत आहेत. मात्र या लसीकरणासाठी ग्रामपंचायत कडुन जे टोकन दिले जाते यात ग्रामपंचायतमधील पदाधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करून आपल्या जवळील नात्यातील लोकाना वशीलेबाजी होत असल्याचे दिसुन आले.असाच एक प्रकार ग्रामपंचायत पदाधिकारी हस्तेक्षेप ब्राम्हणगाव ता. कोपरगाव येथे दिसुन आला. ब्राम्हणगाव ग्रामपंचायत लसीकरणाचे टोकन देण्यात येत आहे.
लसीकरणासाठी टोकन घेण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये नाव नोंदनी करावी लागती पण ही नाव नोंदणी फक्त दिखावासाठी केली जात असल्याचे दिसुन आहे. नाव नोंदणीप्रमाणे टोकन वाटप करणे गरजेचे आहे , पण असे होत नाही .पदाधिकारी आपले जवळील लोकांना व बाहेरगावी असलेल्या पाहूणे मंडळीला हे टोकन वाटप होत असल्याचे दिसुन आले.जर हे पदाधिकारी असे हस्तेक्षेप करीत असेल तर गावातील गरजू लोकांना कधी लसीकरण होईल असा प्रश्न पडला आहे. हे पदाधिकारी आपला पदाचा गैरवापर करीत असुन गावातील लोकांना कधी न्याय मिळेल असा प्रश्न आहे. या समस्यांकडे कोण लक्ष घालून न्याय मिळून दिल याकडे ग्रामस्थांचे लक्ष वेधले आहे.