सांगवीभुसार येथे ६२ वा महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहाने साजरा
सांगवीभुसार येथे ६२ वा महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहाने साजरा
कोपरगाव प्रतिनिधी : कै.ना.बा.बनकर विद्यालय सांगवीभुसार येथे ६२ वा महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. मा.नारायण पा. शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.श्री पांडुरंग पा कासार हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रशांत गाडे सर यांनी केले.सदर कार्यक्रमात कलर्स मराठी वाहिनी वरील सुंदरा मनामध्ये भरली या लोकप्रिय मालिकेतील डॉ.अभिजीत ची भुमिका साकार करणारा कलाकार संकेत शिंदे या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी सर्वश्री रासकर, साबळे सर, निकम सर, शेख सर, बनसोडे सर,श्रीमती सीनगर मॅडम,कासार ताई,भुजबळ सर,दिघे मामा व विद्यार्थी हजर होते.कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना निकाल वाटप करण्यात आले