ब्राम्हणगावमध्ये मुसळधार पाऊस
ब्राम्हणगावमध्ये मुसळधार पाऊस
कोपरगाव प्रतिनिधी : ब्राम्हणगावमध्ये अनेक घरामध्ये व दुकानमधे पुराचे पानी शिरले असुन चौकामध्ये दोन फुट पाणी वाहत होते तसेच शेतीचे नुकसान झाले आहे.
या वेळी कोपरगाव तालुक्याचे युवा नेते मा विवेक भैय्या कोल्हे यांनी पाणी काढण्यासाठी JCB उपलब्ध करुण दिला व अजुन ही काही मदत लागल्यास अर्ध्या रात्री सांगा असे सांगितले. यावेळी विवेक भैया कोल्हे यांनी घटना स्थळी दाखल झालेल्या मा.तहसीलदार साहेब व गटविकास अधिकारी साहेब यांच्याशी संवाद साधला व संजीवनी उद्योग समूह सर्व मदत करेल अशी ग्वाही दिली व शासनाने त्वरित पंचनामे करुण नुकसान ग्रस्त यांना मदत द्यावी ही विनती केली.
यावेळी तहसीलदर साहेब, पंचायत समिती चे गटविकास अधिकारी साहेब,सामाजिक कार्यकर्ते व भाजपा युवा मो तालुका उपाध्यक्ष अनुराग येवले पाटील, पोलिस पाटील रविंद्र भाऊ बनकर,सरपंच साईंनाथ भाऊ आहेर, तलाठी जावळे अप्पा, सर्कल अधिकारी पठाण साहेब, विजयजी कालेकर, देवीदास भाऊ बनकर,किरण भाऊ साळवे, गंगाराम बनकर, वैभव शिंगाडे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.