भारतीय पुरातत्त्व विभागाच्या औरंगाबाद मंडळासमोर आमरण साखळी उपोषण करण्यात येईल – राकेश निकम व दिपक पाटील
संघर्ष न्यूज मुख्य संपादक - सोमनाथ डफाळ मो. 8788193839
भारतीय पुरातत्त्व विभागाच्या औरंगाबाद मंडळासमोर आमरण साखळी उपोषण करण्यात येईल – राकेश निकम व दिपक पाटील
चाळीसगाव प्रतिनिधी – भारतीय पुरातत्त्व विभागाच्या पाटणा येथील चंडिका देवी मंदिरावर भक्त भाविकांकडून अर्पण केलेले सोन्याचांदीचे दागदागिने आणि गेल्या दोन वर्षभरापासून मंदिरावर रोख स्वरूपात आलेले लाखो रुपयांचे दान तसेच खण , नारळ , ओटी , नऊवारी सहावारी साड्या इत्यादीच्या लिलावातून जमविलेले लाखों रुपये या धनद्रव्याचा सर्वप्रथम हिशोब करावा. हिशेबाअंती त्या सर्व रकमेची तेथे नियुक्त अधिकारी तथा वरिष्ठ अभियंता श्री राकेश चंदन शेंडे यांच्याकडून रिकवरी करण्यात यावी. तसेच पाटणा येथील माँ चंडिका पाटणा विकास परिसर नामक खाजगी व बोगस संस्थेशी हातमिळवणी व संगणमत केले. गेल्या दोन वर्षभरापासून या संस्थेने पाटणादेवी मंदिरावर एखाद्या मालका प्रमाणे बसून दिवसाढवळ्या अर्थार्जन केले. मंदिरावरील सुरू असलेला आर्थिक भ्रष्टाचार व भक्त भाविकांची लूटमार याकडे राकेश शेंडे यांनी अर्थ पूर्णपणे कानाडोळा केला. केंद्र शासनाने यांना प्रदान केलेले अधिकार यांचा हेतुपुरस्कर वापर केला नाही. अप्रत्यक्षपणे मंदिरावर सुरू असलेला आर्थिक भ्रष्टाचाराला राकेश शेंडे यांनी खतपाणी घातले. या खाजगी संस्थेला वेळोवेळी मदत व सहकार्यच केले. राकेश शेंडे यांनी कर्तव्यात कसूर करत कर्तव्य प्रति असलेले उत्तरदायित्व निभावले नाही. जोपर्यंत पाटणादेवी मंदिरावरील आर्थिक भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे , तोपर्यंत राकेश शेंडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावे आणि त्यांची बदली करण्यात येऊ नये. असे भारतीय पुरातन सर्वेक्षण औरंगाबाद मंडल यांना दिलेल्या आमरण साखळी उपोषण पत्रात म्हटले आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या राष्ट्रीय स्मारकावर बाह्य स्रोत कामगार म्हणून नियुक्तीसाठी राकेश शेंडे यांनी बेरोजगार युवकांकडून लाखो रुपये लाच स्वरूपात घेतले आहेत. काही बाह्य स्रोत कामगारांना नियुक्त केले नाही तर काहीना आज पावेतो पगार देखील केला नाही. म्हणून राकेश शेंडे यांनी बाह्य स्रोत भरती दरम्यान केलेल्या आर्थिक अपहाराची देखील पारदर्शक व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. नवरात्र उत्सव २०२१ दरम्यान पाटणादेवी मंदिरावर आलेले लाखो रुपयांचे दान व सोन्या-चांदीचे अलंकार यांचा राष्ट्रीय कोषागार खात्यात भरणा करावा. असे न केल्यास भारतीय पुरातत्त्व विभागाच्या औरंगाबाद मंडळात समोर येथे सोमवारी दिनांक २० डिसेंबर रोजी आमरण साखळी उपोषण करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनावर साप्ताहिक रामलीलाचे संपादक राकेश रामदास निकम , दिपक शिवाजीराव पाटील, विलास कारभारी सोनवणे , बूरान सैय्यद , आनंदा भीमराव शेळके व इतर यांच्या सह्या आहेत.