नगरसुल ग्रामपंचायत मालकीची मिळकतीत बेकायदेशीर अतिक्रमण करून घेत आहे लाखोचे उत्पन्न
नगरसुल ग्रामपंचायत मालकीची मिळकतीत बेकायदेशीर अतिक्रमण करून घेत आहे लाखोचे उत्पन्न
येवला प्रतिनिधी – मौजे नगरसुल हद्दीतील मिळकत गट नं.४२२ मध्ये ०.७२ आर ही ग्रामपंचायत मालकीची असुन गुरेचरणांकडे निहित आहे. प्रस्तुत मिळकतीत लक्ष्मण शहादु बोरसे नामक व्यक्तीने सुमारे १० ते १२ वर्षांपासून अतिक्रमण केलेले आहे. बोरसे यांनी सदरचे अतिक्रमण करताना कुठल्याही सक्षम प्राधिकाऱ्याची अथवा ग्रामपंचायतीची परवानगी घेतलेली नाही, प्रस्तुत मिळकतीत अतिक्रमणधारक यांनी सायपन देखील केले आहे.
अतिक्रमणधारक बोरसे हे पीक घेत असून त्यापासून आतापर्यंत लाखोंचे उत्पन्न घेत आहेत. हि बाब गैर व गंभीर स्वरुपाची आहे. अतिक्रमणधारक यानी सुमारे १० ते १२ वर्षाचा कालावधी उलटुन गेला असुन देखील ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधीतावर कुठलीही कार्यवाही केलेली नाही. अतिक्रमणधारक हे मिळकतीपासुन मिळणाऱ्या उत्पन्नातुन कुठलाही प्रकारे सारा अथवा कर देखील भरत नसुन तशी वसुली देखील ग्रामपंचायतीद्वारा केली जात नाही. वास्तविक पाहता शासकीय जमीनीवर अतिक्रमण झाल्यास प्रस्तुत अतिक्रमण निष्काषीत करणे कामी ग्रामपंचायतीने तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे. असे संतोष फरताळे यांनी पत्रकाद्वारे केली आहे