करंजी येथे महिलांसाठी शौचालय बांधण्यासाठी व रस्ता दुरुस्तीसाठी शिवसेना उपतालुका प्रमुख कृष्णा अहिरे यांनी केली मागणी
करंजी येथे महिलांसाठी शौचालय बांधण्यासाठी व रस्ता दुरुस्तीसाठी शिवसेना उपतालुका प्रमुख कृष्णा अहिरे यांनी केली मागणी
कोपरगाव प्रतिनिधी : करंजी ग्रामपंचायत कार्यालयास महिला साठी शौचालय बनवण्यासाठी निवेदन देण्यात आले होते या विषयावर करंजी ग्रामपंचायत ने अजून कुठल्याही प्रकारे काम चालू केले नाही तरी कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री.सचिन सूर्यवंशी साहेबांना विनंती करण्यात आली. बाजाराचा नीलाव झालेला आहे त्या एक लाख सहा हजार मधून करंजीत महिलांसाठी शौचालये बांधण्यात यावे असे निवेदन शिवसेना उपतालुका प्रमुख कृष्णा अहिरे यांनी
कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री.सचिन सूर्यवंशी साहेबांना देण्यात आले.
श्री.सूर्यवंशी साहेबांनी संबंधित ग्रामसेवकांना त्वरित बांधण्यासाठी आदेश देतो असे सांगितले आहे
तसेच बांधकाम विभाग कडे करंजी गावातील ओगदीकडे जाणारा रस्ता दोन महिन्यापूर्वी बनवलेला असून त्यांचे काम निकृष्ट झाल्यामुळे रस्ता फुटलेला असून आपल्या स्तरावरून संबंधित कॉन्ट्रॅक्टरला रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांना डांबरीकरण करून बुजवावे अशी विनंती करण्यात आली केली श्री.लाटे साहेब यांनी सदर रस्ता लवकरात लवकर दुरुस्त होईल व साईड पट्ट्या भरण्यात येतील असे आश्वासन दिले.
करंजी ते ओगदी रस्ता मंजूर झालेला असून लवकरात लवकर काम चालू करण्यात यावे अशी विनंती .