आपला जिल्हा

केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांचे कोपरगावात जंगी स्वागत – युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली भव्य बाईक रॅली

केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांचे कोपरगावात जंगी स्वागत – युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली भव्य बाईक रॅली

कोपरगाव प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोकसभा प्रवास योजनेसंदर्भात आयोजित संवाद मेळाव्यासाठी केंद्रीय जलशक्ती आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल हे शनिवारी कोपरगाव शहरात आले असता भाजप आणि संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. ना.पटेल यांच्या स्वागतासाठी भाजप युवा मोर्चाच्या वतीने सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली भव्य बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीने अवघ्या कोपरगावकरांचे लक्ष वेधून घेतले. रॅलीमुळे कोपरगाव भाजपमय बनले होते.

लोकसभा प्रवास योजनेच्या अनुषंगाने उत्तर अहमदनगर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने कोपरगाव शहर आणि तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, बुथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा शनिवारी केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत कोपरगाव येथील कलश मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांचे आज शिर्डी येथील साईबाबा विमानतळावर आगमन होताच कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार तथा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी त्यांचे स्वागत केले. तेथून ना. प्रल्हादसिंह पटेल यांचे भाजप नेते, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे, युवा नेते विवेकभैय्या कोल्हे आदींसमवेत सायंकाळी पावणेसातच्या सुमारास कोपरगाव शहरानजीक नगर-मनमाड महामार्गावर असलेल्या राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रम या ठिकाणी आगमन झाल्यानंतर त्यांनी जनार्दन स्वामी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.
त्यानंतर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रमापासून कोपरगाव येथील कलश मंगल कार्यालयापर्यंत ना. प्रल्हादसिंह पटेल, ना.राधाकृष्ण विखे पाटील,भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्यदिव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीचे नेतृत्व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.
या रॅलीत भाजपचे ‘कमळ’ चिन्ह असलेले झेंडे मोटारसायकल़ला बांधून आणि गळ्यात ‘कमळ’ चिन्ह असलेले गमछे अडकवून घोषणा देत भाजप आणि भाजयुमोचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भारतमाता की जय, वंदे मातरम्,भारतीय जनता पार्टीचा विजय असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या रॅलीमुळे कोपरगाव शहर भाजपमय झाल्याचे दिसून आले.


या रॅलीमध्ये अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, शरद नाना थोरात, भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष डी. आर. काले, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक़म पाचोरे, शहराध्यक्ष अविनाश पाठक, कोपरगाव न. प. तील भाजपचे माजी गटनेते रवींद्रअण्णा पाठक, माजी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, माजी नगरसेवक विजय वाजे, जनार्दन कदम, अल्ताफभाई कुरेशी, दिनेश कांबळे, दीपक जपे, शिवाजी खांडेकर, विवेक सोनवणे, वैभव गिरमे, प्रसाद आढाव, इलियास खाटीक, अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष खलीकभाई कुरेशी, सोमनाथ मस्के, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सतीश आव्हाड, वेणुनाथ बोळीज, नाईकवाडे, वैभव आढाव, किरण सुपेकर, गोपीनाथ गायकवाड, सिद्धार्थ साठे, जगदीश मोरे, कैलास खैरे, सुशांत खैरे, जितेंद्र रणशूर, वासुदेव शिंदे आदींसह संजीवनी उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, भारतीय जनता पक्ष आणि भाजयुमो तसेच पक्षांतर्गत विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे