शिक्षक दिनानिमित्त सांगवीभुसार येथील शिक्षकांचा सत्कार
शिक्षक दिनानिमित्त सांगवीभुसार येथील शिक्षकांचा सत्कार
कोपरगाव प्रतिनिधी -: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी भुसार येथे ५ सप्टेंबर २०२२ रोजी शिक्षक दिनानिमित्त गावचे भूषण श्री.राजेंद्रबापू जाधव मा.उपाध्यक्ष महानंदा मुंबई यांनी सर्व शिक्षकांचा यथोचित सत्कार करून व शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी भुसार या ठिकाणी या शैक्षणिक वर्षांमध्ये 225 मुले पहिली ते आठवी या वर्गात शिक्षण घेत असून वर्षभरात विविध उपक्रम राबविण्यात येतात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती ,निसर्ग प्रेम वृक्षारोपण व माझी वसुंधरा अभियान मध्ये सक्रिय सहभाग असे वर्षभर उपक्रम राबवले .शाळेच्या विकासामध्ये शिक्षकांबरोबरच समाजाचे व गावाचे योगदान मिळत असल्याने शाळेच्या शैक्षणिक वातावरण निर्मितीमध्ये वाढ होत आहे. संगणकाच्या ज्ञानापासून विविध प्रयोगात्मक उपक्रम राबवून शिक्षक गुणवत्ता वाढीसाठी सतत प्रयत्नशील आहेत.
याप्रसंगी श्री.नारायणराव जाधव, श्री.माधवराव जाधव, श्री रोहिदास शिंदे.व्हा. चेअरमन ,श्री सुनील बंदरे तंटामुक्ती अध्यक्ष, श्री. प्रशांत मोरे ,श्री. लक्ष्मण गोसावी ,श्री. तान्हाजी जाधव ,श्री. किशोर जाधव व सर्व ग्रामस्थांनी शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.