आपला जिल्हा

मतदार संघातील प्रत्येक घटकाचा उत्कर्ष साधून न्याय देण्याचा प्रयत्न – ना. आशुतोष काळे

मतदार संघातील प्रत्येक घटकाचा उत्कर्ष साधून न्याय देण्याचा प्रयत्न – ना. आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी – महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया अशी कोपरगाव मतदार संघाची ओळख होती.मात्र मागील काही वर्षापासून ही ओळख पुसली गेली आहे. राजकीय पदार्पण केल्यापासून मतदार संघाची ही ओळख पुन्हा मिळवायची असा मनाशी निश्चय केला असून त्या दृष्टीने वाटचाल करीत असताना मतदार संघातील प्रत्येक घटकाचा उत्कर्ष साधून न्याय देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी केले आहे.

पुणतांबा येथील ईदगाह मैदानावर १० लक्ष रुपये निधीतून बसविण्यात येणाऱ्या पेव्हिंग ब्लॉक कामाचे भूमिपूजन व वाकडी येथे १० लक्ष रुपये निधीतून मुस्लिम कब्रस्तानच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे भूमीपूजन नुकतेच ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, कोपरगाव तालुक्यातील गावांप्रमाणेच मतदार संघाला जोडलेल्या राहाता तालुक्यातील अकरा गावांचा विकास करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. त्यामुळे या अकरा गावातील रस्ते, वीज, पाणी हे प्रश्न सोडविण्या बरोबरच मुस्लिम समाजाच्या कब्रस्थानसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देणे ही माझी जबाबदारी आहे.त्या जबाबदारीशी बांधील राहून निधी दिला आहे तसेच इतर समाजासाठी देखील निधी देवून सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका असल्याचे ना.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.यावेळी ना. आशुतोष काळे यांनी ८० लक्ष रुपये निधीतून करण्यात येत असलेल्या गणेशनगर – वाकडी रस्त्यावरील पुलाच्या कामाची पाहणी केली.

याप्रसंगी पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, मुरलीधर थोरात, अनिल कोते, अण्णासाहेब कोते, महेश जाधव, भाऊसाहेब लहारे, अशोक शेळके, मुरलीधर शेळके, सुरेश लहारे, शंकर लहारे, निलेश कोते, निलेश लहारे, जालिंदर कोते, प्रभाकर एलम,मौलाना फारूक काजी, मौलाना अकील, उपसरपंच महेश चव्हाण, शांतीलाल भाटी, शैलेश कुलकर्णी, बाळासाहेब चव्हाण, अशोक धनवटे, संजय धनवटे, सुनील थोरात, शाम धनवटे, शौकत शेख, अस्लम शेख, अजीम तांबोळी, युनूस तांबोळी, मोहीद्दीन शेख, अरुण बाबरे, विकास तोलानी, प्रफुल्ल धनवटे,मुनिर शेख, जाकीर शेख, अकबर शेख, इरफान पठाण, सलिम शेख, दत्तात्रय लांडे, विनायक देठे, भाऊसाहेब आहिरे, राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा शितल लहारे, अनिल जाधव, कैलास पानसरे, विजय सदाफळ, किशोर कोते, बाळासाहेब कोते, सार्वजनिक बांधकाम अभियंता सुमित घोरपडे, तलाठी विश्वनाथ बोधमवाड, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे