महिला बचत गटाच्या दीपावली प्रदर्शन संपन्न
महिला बचत गटाच्या दीपावली प्रदर्शन संपन्न
कोपरगाव प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवनोन्नती अभियान (MSRLM )पंचायत समिती कोपरगाव यांच्या वतीने दिपावली निमित्ताने महिला बचत गटांची उत्पादित केलेल्या वस्तु व फराक यांचे विक्री प्रदर्शन पंचायत समिती प्रांगनात दि. १/११/२०२१ ते २/११/२०२१ दरम्यान आयोजित करण्यात आले होते . या विक्री प्रदर्शनाचे उदघाटन मा. सभापती पौर्णिमाताई जगधने यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समुहातील होतकरू महिलांच्या कलागुणना वाव मिळावा. हे प्रदर्शन पंचायत समितीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले आहे. उमेद अभियानांतर्गत बचत गटांनी उत्पादित केलेल्या अस्स्वल व गुणवत्तापूर्वक वस्तु व खादयपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आलेले आहेत.
उमेदच्या माध्यमातून विविध उपजिविकेचे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. यावेळी महिलांनी उत्पादित केलेल्या दिवाळी फराळ अकाश कंदिल, पणती, लक्ष्मी, भाऊ, रोगोळी, उठो, अगरबत्ती लोणचे, पापड, कटलरी, साहीत्य, मान्छ तुप, पाकर सोद्रीय गुळ मांगे, शेषया असे विविध पदार्थ विक्रीस ठेवण्यात आलेले आहेत. पंचायत समितीमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी या स्टॉलला भेट देवून खरेदी केली व समाधान व्यक्त केले.
या विक्री प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुचकर खादयपदार्थ उपलब्ध होत असुन दीपावली निमित्त जिल्हा पंचायत समितीतील सर्व कर्मचारी या ठिकाणी खरेदी करावी असे अवाहन कोपरगावचे पंचायत समितीचे गटविकास मा. सचिन सुर्यवंशी साहेब यांनी केले आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कोपरगावच्या तालुका अभियान व्यवस्थापक बारखे मॅडम, तालुका व्यवस्थापक पाटील मॅडम, श्री जाधव सर भी दारवटे सर, पवार सर, जयपाल सर , मेथ सर ,शेळके सर यांना मोलाचे सहकार्य केले.