महाराष्ट्र

मनरेगा अंतर्गत कामे अधिक व्यापक करण्याचा मानस — सचिन सूर्यवंशी

मनरेगा अंतर्गत कामे अधिक व्यापक करण्याचा मानस — सचिन सूर्यवंशी

कोपरगाव प्रतिनिधी -: कोपरगाव तालुक्यात मनरेगा अंतर्गत सुरू असलेले काम अधिक सुसूत्रपणे आणखी व्यापक करण्याचा मानस प्रशासक तथा गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कोपरगाव तालुक्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकांच्या तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ प्रशासक तथा गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या कार्यक्रमासाठी सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब साबळे, कृषी अधिकारी पंडित वाघेरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप, विस्तार अधिकारी पंचायत तोरवणे,प्रशिक्षक मनोज पाटील व दिपक मराठे ,मनरेगा कक्षाचे सर्व कर्मचारी, आणि तालुक्यातील सर्व रोजगार सेवक उपस्थित होते


सदर प्रसंगी मनरेगा अंतर्गत तालुक्यात यावर्षी एक लक्ष मनुष्य दिन रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व ग्राम रोजगार सेवकांनी नियोजनपूर्वक काम करण्याच्या सूचना दिल्या. कोपरगाव तालुक्यात सध्या मनरेगा अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांसाठी अकुशल मजुरी तसेच शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत अभिसरण करून गाय गोठ्याचा लाभ दिला जातो. याशिवाय, पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने तालुक्यात मागील दोन वर्षात सुमारे ३०,००० रोपांची लागवड करण्यात आली असून या सर्व रोपांचे संवर्धन मनरेगाचे मजूर करतात. .

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे