आपला जिल्हा

शिवसूत्र युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या पाठपुराव्या नंतर पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांची बदली अखेर रद्द !!

शिवसूत्र युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या पाठपुराव्या नंतर पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांची बदली अखेर रद्द !!

शिवसुत्र युवा प्रतिष्ठान यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला आले यश ! !

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांची बदली नाशिक ग्रामीण या विभागात करण्यात आली होती. दौलतराव जाधव यांनी कोपरगाव मध्ये कोरोना महामारीच्या काळामध्ये अतिशय शिस्तबद्ध काम केले तसेच ग्रामीण भागातील गुन्हेगारी प्रवृत्तीस आळा बसवला त्यामुळे कोपरगाव पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी कमी कालावधीमध्ये सर्वसामान्यांच्या मनावर अधिराज्य निर्माण केले आहे.अशा कर्तबगार पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांची बदली रद्द करून कोपरगावसाठी कार्यकाळ वाढवावा अशी मागणी शिवसूत्र युवा प्रतिष्ठानने राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली होती ही मागणी मान्य करत अखेर ती रद्द झाली आहे.


त्याबद्दल शिवसूत्र युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष ,भाजपा युवा उपअध्यक्ष सुधाकर वक्ते म्हणाले कि प्रशासन हे सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेतात व त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. पोलिस निरीक्षिक दौलतराव जाधव यांच्यासारख्या संयमी व शिस्तबद्ध अधिकाऱ्याची कोपरगावला गरज आहे.त्यांची बदली रद्द केल्या बद्दल शिवसुत्र युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ,भाजपा युवा उपअध्यक्ष सुधाकर वक्ते,उपअध्यक्ष विशाल गुरसळ, प्रदिप गायकवाड, राहुल चव्हाण, राहुल वक्ते, मधुकर वक्ते, किरण चव्हाण,विक्रम चव्हाण, विकी जगताप, गौतम गायकवाड, ऋषीकेश वक्ते, ऋषी गुरसळ, कुलदीपक वक्ते विश्वजीत वक्ते, गौतम गायकवाड, सौरव पवार, किशोर गायकवाड, प्रदिप वक्ते, राहुल देवकर, साईनाथ वायकर, खंडू गांगुर्डे,किरण वक्ते, पोपट सोळके, अजय सुपेकर यांच्यासह विजय आढाव, पराग संधान, प्रसाद नाईक, प्रशांत होन, संदीप देवकर, बापू साहेब, सुरळकर, संदीप शिरोडे, दिनेश कोल्हे, विवेक खांडेकर, संतोष नेरे, प्रशांत निकुंभ, संतोष पवार, नितीन त्रिभुवन, उमेश लोंढे, उमेश गोसावी, प्रशांत शहाणे, कैलास शेळके, बाळासाहेब निकॉले, केशवराव होन, अनिल मुसमाडे, बाळासाहेब कदम, दिपक सुपेकर यांच्यासह कोपरगांव तालुक्यातील सायकल वारी चे सर्व सभासद प्रशासनाचे आभार मानले आहे.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे