पत्रकार विनोद जवरे यांचा आमदार तांबे कडून गौरव
पत्रकार विनोद जवरे यांचा आमदार तांबे कडून गौरव
कोपरगाव प्रतिनिधी – सोमनाथ डफाळ
कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील पत्रकार विनोद नामदेव जवरे यांचा नाशिक पदवीधर मतदार संघाचे प्रतिनिधी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी नुकताच पत्रकार जवरे यांना प्रशस्ती पत्र देऊन सन्मान केला आहे.
या वेळी बोलताना डॉ तांबे यांनी सांगितले की, कोरोना सारख्या महामारीत आपल्या जीवाची पर्वा न करता सर्वसामावेशक माहिती बातम्या द्वारे सर्व सामन्य पर्यंत पोहचवण्याचे कार्य सर्व पत्रकारांनी केले. कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील ग्रामीण भागातील एक उमदा पत्रकार म्हणून विनोद जवरे यांनी देखील उत्कृष्ट कार्य केले आहे. तसेच ते आपल्या माध्यमातून येथून पुढे देखील आपले पत्रकारिता क्षेत्रातून सामाजिक कार्य सुरूच ठेवतील यात शंका नाही तसेच त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देतो असे गौरवोद्गार आमदार डॉ तांबे यांनी काढले.